मोठी बातमी, तहव्वुर राणाला भारतात आणलं, विमान पालममध्ये उतरले

मोठी बातमी, तहव्वुर राणाला भारतात आणलं, विमान पालममध्ये उतरले

Tahawwur Rana : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर हुसैन राणाला (Tahawwur Rana) आज अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर भारतात आणण्यात आले आहे. त्याला एनआयए (NIA) आणि गुप्तचर संस्था रॉ (RAW) यांचे संयुक्त पथकाने कडक सुरक्षेत भारतात आणले आहे. भारतात दाखल झाल्यानंतर आता त्याची एनआयच्या मुख्यालयात चौकशी होणार आहे.

आतापर्यंत पाकिस्तानने 26/11 च्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही त्यामुळे चौकशीत राणा धक्कादायक खुलासे करू शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये इतर कोणते दहशतवादी नेटवर्क आहेत, भारतात इतर कुठे हल्ले करण्याच्या योजना आखल्या जात होत्या? याबाबत देखील त्याच्याकडून माहिती मिळण्याची शक्यता आहे. एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशीष बत्रा आणि डीआयजी जया रॉय तहव्वुर राणाची चौकशी करणार आहे.

128 वर्षांनंतर ‘गोल्ड मेडल’ साठी भिडणार क्रिकेट संघ, 2028 ऑलिंपिकमध्ये अमेरिकेसह ‘या’ संघाला संधी?

166 जणांचा मृत्यू

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह 166 जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंडपैकी एक असलेला अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमनचा तहव्वुर राणा निकटवर्तीय होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने मुंबईतील रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्सवर हल्ला केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube