Mumbai News: मुंबईतील वांद्रे परिरसातील गरीबनगर अनधिकृत झोपडपट्टी (Mumbai News) कारवाईदरम्यान, पोलिसांवर झालेल्या दगडफेक झाल्याची घटना घडलीयं. गरीबनगर झोपडपट्टीतील स्थानिक नागरिकांनी कारवाईदरम्यान पोलिसांवर अचानक दगडफेक सुरु केल्याने मोठ्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या दगडफेकीत जवळपास 15 पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे.
VIDEO : परीक्षेच्या आधी मध्यरात्री घेत होता रिव्हीजन…शिवराज मोटेगावकरचं नाव मोठं अन् लक्षण खोटं
वांद्रे परिसरातील गरीबनगर भागात अनेक वर्षांपासून अनधिकृत झोपडपट्टी बांधत नागरिकांनी अतिक्रमण केलंय. या अनधिकृत झोपडपट्टीविरोधात प्रशासनाकडून काल कारवाई करण्यात आली. मात्र, झोपडपट्टीधारक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवत पोलिसांवरच दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर आज प्रशासनाच्यावतीने गरीबनगर झोपडपट्टी भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलायं.
सोनी लिव्ह 5 जून रोजी घेऊन येत आहे ‘Gullak 5’ ; ‘स्लाइस-ऑफ-लाइफ’ मालिकेचे भव्य पुनरागमन
झोपडपट्टी विरोधात आजही कारवाई करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आरपीएफ आणि मुंबई पोलिस मिळून एक हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलायं. गरीबनगर भागात पुन्हा दगडफेक झाली तर जमावाला कंट्रोल केलं जाऊ शकतं, यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
