Download App

टवाळखोरांनी वाघनखांवरच प्रश्न उपस्थित केला; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Ashish Shelar On Aditya Thackeray : मुंबई भाजपचे (Mumbai BJP)अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे (Shivsena Thackerya Group)आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवछत्रपतींच्या वाघनखांबद्दल माहिती दिली.

त्यावेळी शेलार म्हणाले की, शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त लंडनमधील व्हिक्टोरियन अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात आणण्याचा करार महाराष्ट्र सरकारने केला. नोव्हेंबरमध्ये ही वाघनखं भारतात येणार आहेत. त्यावर काही टवाळखोरांनी वाघनखांवरच प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.

‘तिच्या’ धाडसाला तोड नाही; हमासच्या 24 दहशतवाद्यांना कंठस्नान, जगभरात होतंय कौतुक

आशिष शेलार म्हणाले की, लंडनमधून आणलेल्या वाघनखांबद्दलतची माहिती, मंत्री सुधीर मुनगंटीवार आल्यानंतर देतीलच. पण त्याआधीच राज्यामध्ये नव्हे जे आजपर्यंत टवाळखोर होते, ते आता शंकेखोर झालेत. अशा शंकेखोर टवाळांनी या वाघनखांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 लोक उरतील तर शरद पवारांचा पक्षही किंचित…; बावनकुळेंचा हल्लाबोल

इतिहासतज्ज्ञ त्यावर बोलतील हा भाग वेगळा पण ज्यांच्या बुद्धीमध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये केवळ टवाळक्या करणं आणि शंका घेणं याशिवाय दुसरं काही नाही, अशा पक्षातील नेत्यांनी आणि थेट सांगायचं झालं तर आदित्य ठाकरे यांनी शिवछत्रपतींच्या वाघनखांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्याला सडेतोड उत्तर म्हणून, शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच… हा व्यक्तीचा नसून विचारांचा विषय आहे. अशा विचारांचा कोथळा काढण्यासाठी एक कार्यक्रम भाजपच्या वतीने वाघनखांच्या निमित्ताने असं राहुल सोलापूरकर यांचं व्याख्यान आपली शौर्य परंपरा जनतेसमोर आणण्यासाठी नंदेश उमप यांचा शाहिरी कार्यक्रमाचे आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम 12 ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता सावरकर सदनामध्ये होणार आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात शंकेची कीड वळवळते त्यांना त्यांच्या बुद्धीत भर घालायची असेल तर त्या कार्यक्रमाला यावे.

Tags

follow us