उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 लोक उरतील तर शरद पवारांचा पक्षही किंचित…; बावनकुळेंचा हल्लाबोल

  • Written By: Published:
उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 लोक उरतील तर शरद पवारांचा पक्षही किंचित…; बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrasekhar Bawankule : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं. बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंकडे फक्त चार लोक उरतील. तर शरद पवारांचा पक्षही किंचित होईल, त्यांना उमेदवारही मिळणार नाही, असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला.

Mla Disqualification : सुनावणी एक दिवस आधीच का? राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण… 

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पक्षचिन्हावरून मोठा संघर्ष सुरू झाला. शरद पवार गटातील अनेक आमदार अजित पवारांसोबत गेले. जे शिवसेनेचं झालं, त्याचीच पुनरावृत्ती राष्ट्रवादीमध्ये होतांना दिसते. याविषयी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चार लोक उरतील. तर शरद पवारांची जी राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे, ती किंचित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अजित पवार हे विकासाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला बळकटी देत आहेत. ते सकाळी 7 ते रात्री उशीरापर्यंत काम करत असतात. त्यामुळं पुढच्या काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी दिसले. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही, असं बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे हे आज मावळ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा सुरू आहे. घरी चलो अभियानाच्या माध्यातून आम्ही 3 कोटी घरी जाणार आहोत. ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीयासाठी ज्या योजना केंद्राने राबवल्या त्या योजनांचं पुस्तक घेऊन आम्ही घरोघरी जातो, तेव्हा लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. हा पाठींबा पाहता, आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती लोकसभेच्या 45 हून अधित जागा तर विधानसभेच्या 225 हून अधिक जागांवर विजय मिळवू असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. मोदीच पंतप्रधान व्हावे, ही भावना जनमाणसात असल्याचं ते म्हणाले.

महायुतीत लढत असतांना काही जागा शिंदे किंवा अजित पवार गटांकडे गेल्या तरी महायुतीचा उमेदवार निवडणून आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकत लावेल, असंही ते म्हणाले.

गुजरात सरकार उद्योगांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत कार्यक्रम घेत आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे मुंबईत आयोजन करण्यात आले. यावरून गुजरात-महाराष्ट्र वाद पेटण्याची शक्यता आहे. याविषयी विचारलं असता बावनकुळे म्हणाले की, गुजरात-महाराष्ट्र वाद पेटण्याचा काय संबंध आहे? शेवटी महाराष्ट्राचे अनेक कार्यक्रम गुजरातमध्ये होतात. गुजरातचे कार्यक्रम महाराष्ट्रात होतात. एकच देश आहे, भारत-पाकिस्तान आहे का? कोणी याचं राजकारण करू नये. राजकारणाकरता अशा कार्यक्रमांना गालबोट लावू नये, असं ते म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube