हिंदू लडकीयों को मुस्लिम… म्हणत सहकारी तरूणींना अश्लील मॅसेजेस; नाशिकनंतर मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime मुंबईमध्ये देखील कंपनीमधील सहकाऱ्याकडून सहकारी तरुणांचं शोषण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mumbai Crime

Mumbai Crime

Mumbai Crime after Nashik Male colleague sets Obscene messages to female colleagues : राज्यामध्ये सध्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यामध्ये सुरुवात झाली ते नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणापासून त्यानंतर नाशिकच्या आयटी कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण त्यानंतर अमरावतीतील परतवाडा येथील प्रकरण आणि आता मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारे कंपनीमधील सहकाऱ्याकडून सहकारी तरुणांचं शोषण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील आगरीपाडा भागामध्ये बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत काम करणाऱ्या एक 19 वर्षीय तरुणी काम करते. तिला काही महिन्यांपूर्वी सोबत काम करणाऱ्या तरुणाने अश्लीलमेसेज फोटो आणि व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली होती. त्यानंतर तो हळूहळू तरुणीच्या देखील फोटोंची मागणी करू लागला. त्यानंतर त्याने तरुणीकडे लॉजवर जाऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.

आईचं छत्र गमावलं तरी पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेताच वानखेडे गहिवरलं; कोण आहे मुकश चौधरी?

तसेच त्याने असं देखील म्हटल्याचा दावा या तरुणीने केला की, ‘आजकल हिंदू लडकी को मुस्लिम पसंद है’ तसेच हे प्रकार या तरुणीच्या इतर मैत्रिणींसोबत देखील केल्याचा दावा या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. मात्र यातील एका तरुणीने तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी अश्रफ नावाच्या तरुणाविरुद्ध आगरी पाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून शिवसेनेतच तू-तू, मैं-मैं; मनसेचा मात्र जाहीर पाठिंबा…

दरम्यान या तरुणाने ही पिडीत तरुणी फेब्रुवारी महिन्यात बांधकाम क्षेत्रातील महालक्ष्मी या कंपनीत टेली कॉलर म्हणून काम करत असताना त्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप होता. यातून त्याने अनेक तरुणींचे मोबाईल नंबर मिळवले आणि हा प्रकार केल्याचा समोर आल आहे. मात्र या तरुणीने वेळीच आपल्या वडिलांनाही सर्व माहिती दिल्याने ह्या आरोपीचे पितळ उघड पडल आहे.

Exit mobile version