Download App

Jitendra Awhad : बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा तटकरेंनी मला दम भरला होता; आव्हाडांचे तटकरेंवर गंभीर आरोप

Jitendra Awhad On Sunil Tatkare : बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare)यांनी कुणब्यांविषयी आपल्या पुस्तकात वाईट पद्धतीनं लिहिलं होतं. तेव्हा आपण पुरंदरेंना विरोध केला होता, त्यावेळी खासदार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare)विरोध करत दम दिला होता, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad )यांनी केला आहे. आव्हाडांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : ऐन दिवाळीत फटाक्यांवर बंदी; महाराष्ट्रात काय होणार?

मराठ्यांच्या विरोधातील इतिहास चुकीचा लिहिला जात होता, त्याला आपण विरोध केला. त्यावर खासदार सुनील तटकरेंनी मला दम देत बोलू नको असं सांगितलं होतं, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आव्हाडांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आव्हाडांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.

बांग्लादेशला मोठा धक्का, शाकीब अल हसन विश्वचषकातून बाहेर

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मराठ्यांच्या विरोधातील इतिहास चुकीचा लिहिला होता. त्याला मी विरोध केला, त्यावेळी खासदार सुनील तटकरेंनी मला दम देऊन बोलू नको असं सांगितलं होतं. असं असलं तरी शरद पवार यांनी मला सांगितलं की, मी तुझ्या पाठिशी आहे, तुला जे काही बोलायचं ते बोल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेंबद्दल खासदार तटकरेंनी मी क्षुद्र असल्याने माझ्यावर टीका होत असल्याचं म्हटलं होतं. हे बोलताना जरा मागं वळून पाहिलं असतं तर तुम्हाला जी पदं मिळाली ती चांगल्या-चांगल्या घराण्यांना देखील मिळाली नाही. आदिती तटकरेंना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शरद पवार यांच्यामुळेच मिळालं.

तुमच्या घरात तुम्हाला मंत्रिपद, पुतण्या, मुलगा, भाऊ सर्वांना आमदारकी तसेच तुम्हाला खासदारकी देखील दिली. मला पालकमंत्रिपद न देता तुमच्या मुलीला आदिती तटकरेंना ते पद दिलं, असा आलेखच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाहेर काढला.

आव्हाड म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरेंनी मराठा-कुणब्यांविषयी वाईट पद्धतीनं लिहिलं होतं. तेव्हा आपण विरोध केला, तुमच्याकडून विरोध तर झालाच नाही पण उलट मला माझं वक्तव्य मागं घेण्यासाठी दमबाजी केली. शरद पवार यांच्याशी मी या विषयावर बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की, तुझं वक्तव्य मागं घेतलंच पाहिजे असं नाही.

Tags

follow us