बांग्लादेशला मोठा धक्का, शाकीब अल हसन विश्वचषकातून बाहेर
World Cup 2023 : बांग्लादेशचा कर्णधार शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) विश्वचषकातून (World Cup) बाहेर झाला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या विजयानंतर बांग्लादेशसाठी हा मोठा धक्का आहे. शाकीबच्या नेतृत्वाखालील बांगलादेशने गेल्या सोमवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. पण याच सामन्यात शाकिबच्या डाव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला.
बॉल आणि बॅटने अप्रतिम कामगिरी करत शाकिबने श्रीलंकेविरुद्ध सामनावीराचा किताब पटकावला होता. गोलंदाजीत त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. यानंतर फलंदाजीत 280 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 65 चेंडूत 126.15 च्या स्ट्राईक रेटने 82 धावा केल्या होत्या. यात 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मात्र, बांग्लादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
World Cup 2023 : भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाची एन्ट्री पक्की; सेमीफायनलचा चौथा संघ कोणता?
त्याच्या दुखापतीबद्दल सांगायचे तर, श्रीलंकेविरुद्धच्या मॅचनंतर शाकिबचा एक्स-रे करण्यात आला, यामध्ये फ्रॅक्चर आढळले. बांग्लादेशचे फिजिओ बायजेदुल इस्लाम यांनी सांगितले की, श्रीलंकेविरुद्धच्या डावाच्या सुरुवातीला शाकिबला दुखापत झाली होती, परंतु त्याने वेदनाशामक आणि सपोर्टिंग टेपच्या मदतीने फलंदाजी सुरू ठेवली.
विश्वचषकात अशी होती कामगिरी
श्रीलंकेविरुद्धच्या खेळीशिवाय शाकिबकडून कोणतीही विशेष कामगिरी झालेली नाही. शाकिबने 7 सामन्यात केवळ 26.57 च्या सरासरीने 186 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत त्याने केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत.
World Cup 2023 : इंग्लंडचा आणखी एक पराभव ! वर्ल्डकपबरोबर चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर
बांग्लादेश शनिवारी, 11 नोव्हेंबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्पर्धेतील 9वा आणि शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. बांग्लादेशने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत.