Sunil Tatkare यांना कधी अपात्र करणार?; नार्वेकरांचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी धाडलं लोकसभा अध्यक्षांना पत्र

  • Written By: Published:
Sunil Tatkare यांना कधी अपात्र करणार?; नार्वेकरांचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी धाडलं लोकसभा अध्यक्षांना पत्र

Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील दाखला दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sanjay Raut : डिसेंबरमध्ये सरकार जाणार म्हणून जानेवारीची मुदत; राऊतांनी सांगितलं CM शिंदेंच्या मनातलं

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी विभागणी झाली आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याच पद्धतीने अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारां खासदांवरही अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

त्यात आता शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सप्रिया सुळेंनी (Supria Sule) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र धाडत खासदार सुनील तटकरेंना (Sunil Tatkare) कधी अपात्र करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदारांवरील कारवाईसाठी दिलेल्या निर्देशांचा दाखल दिला आहे. (Supria Sule Write Letter To Loksabha Speaker For Taking Action Against MP Sunil Tatkare )

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आदरणीय ओम बिर्ला जी, मी 4 जुलै 2023 रोजी भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत सुनील तटकरे यांना अपात्र ठरवण्यासाठी अपात्रता याचिका दाखल केली होती. मात्र चार महिने उलटून देखील त्या याचिकेवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दरम्यान एका दोषी खासदाराने अशा प्रकारे पदावर राहणे म्हणजे दहाव्या अनुसूचीच्या नियमाचं उल्लंघन आहे. असं देखील सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.

Mahad MIDC Blast: रायगडच्या महाड MIDCतील कंपनीत भीषण स्फोट, अग्निकांडात 4 जणांचा मृत्यू

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्य घटना आणि लोकशाहीचे मुल्ये आणि तत्त्वे टिकवून ठेवण्यासाठी अशा याचिकांचे वेळीच निराकराण करावे असे निर्देश संबंधितांना केलेले आहेत. यामध्ये त्यांनी नाव न घेता राहुल नार्वेकरांचा दाखला देखील दिला आहे. त्यामुळे कृपया या याचिकेचा निकाल लावण्यास विलंब करू नये अशी माझी विनंती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube