Mahad MIDC Blast: रायगडच्या महाड MIDCतील कंपनीत भीषण स्फोट, अग्निकांडात 4 जणांचा मृत्यू
Raigad MIDC Company Explosion: रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील (MIDC ) ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये (Blue Jet Healthcare Limited Company) मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार दगावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणेसह पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड (Mahad MIDC) एमआयडीमधील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये शुक्रवारी (3, नोव्हेंबर) सकाळी मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एका कामगाराला गॅसची लागण झाली असून 4 कामगार जण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप या मृत्यूविषयी कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही.
Maratha Reservation : फडणवीसांचे नियोजन, CM शिंदेंचे प्रयत्न अन् जरांगेंनी साधलेले टायमिंग
या दुर्घटनेतील 3 जखमी कामगारांवर महाड ग्रामीण हॉस्पियलमध्ये उपचार सुरू आहे. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलासह ग्रामीण पोलीस प्रशासन देखील लगेच घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रण आणण्याचे काम सुरू असून काही कामगार अडकल्याची भिती वर्तवली जात आहे.