राम शिंदे-रोहित पवार एका MIDC साठी भांडतायत; विखेंनी एकाच वेळी दोन मंजूर करून मारली बाजी

  • Written By: Published:
राम शिंदे-रोहित पवार एका MIDC साठी भांडतायत; विखेंनी एकाच वेळी दोन मंजूर करून मारली बाजी

अहमदनगर: कर्जतमधील एमआयडीसीवर आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले होते. या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जोरदार संघर्ष पाहिला मिळाला. या एमआयडीसीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या दोघांमध्ये वाद सुरू असताना एमआयडीसी मंजूर करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आता तब्बल दोन एमआयडीसी मंजूर करून बाजी मारली आहे. विखे यांनी एक एमआयडीसी आपल्या मतदारसंघात तर दुसरी एमआयडीसी (MIDC) शिर्डीत मंजूर करून घेतली आहे.

Sharad Pawar : ‘जालन्यात लाठीहल्ला करण्याची गरजचं नव्हती’

मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एमआयडीसींबाबत बैठक झाली.त्यात एमआयडीसींना मंजुरी मिळाली आहे. नगरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नगर जिल्ह्यासाठी दोन नव्या एमआयडीसींना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अहमदनगर फेज 2 एमआयडीसी आणि शिर्डी येथे साईबाबांच्या पवित्र भूमीत साईबाबांच्या नावाने एक एमआयडीसी उभारण्यास मंजुरी मिळाली असल्याचे विखे यांनी सांगितले.

शिष्याच्या विरोधात पवारांनी दिली गुरुला ताकद; अनिल पाटलांना बंडखोरी महागात पडणार?

या दोन्ही एमआयडीसीसाठी आवश्यक जमिनी या महाराष्ट्र शासनाच्या आहेत. यामुळे शासन कमी दरात या जमिनी एमआयडीसीला देऊन नवीन उद्योगांना त्या ठिकाणी चालना मिळावी यासाठी महसूलविभाग व उद्योग मंत्र्यांनी सहकार्य केले आहे.त्यांचे मी आभार मानतो असे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे.

एमआयडीसींची यापूर्वीपासून मागणी होती. नगर हा ‘डी झोन’ आहे व आम्ही विनंती केली की हा ‘डी प्लस’असावा.तसेच शिर्डी हे प्रसिद्ध आहे.साईबाबांच्या नावाने अनेक उद्योग या ठिकाणी येतील.याठिकाणी एमआयडीसी व्हावी ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. विषय जो अनेक दिवसांपासून प्रलंबित होता जो आज मार्गी लागला आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.

राम शिंदे, रोहित पवार हे एका एमआयडीसाठी शासन दरबारी प्रयत्न करत होते. परंतु खासदार विखे यांनी दोन एमआयडीसी मंजूर करून एक प्रकारे राजकीय बाजीच मारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube