Chitra Vagh : मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्राची माफी मागा अन्… चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Chitra Vagh : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई म्हणत पुन्हा निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंच्या राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याच्या आरोपांना उत्तर दिले आहे. त्याचबरोबर भाजपच्या कार्यकाळात कसे उद्योग वाढले याचा पाढाचं वाचून दाखवला.
मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्राची माफी मागा अन्…
महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, सुप्रिया सुळे, कितीही हा महाराष्ट्रद्रोहीपणा आणि करंटेपणा? आपल्याच राज्याची प्रगती तुम्हाला सहन होत नाही का हो..??कधी आयएसआय फंडेड वेबसाईटची माहिती सांगत महाराष्ट्रात विद्वेष पसरल्याचे सांगता, तर कधी महाराष्ट्रात उद्योग येऊनही उद्योग बाहेर चालल्याचा कांगावा पिटता.महाराष्ट्राची तत्काळ माफी मागा आणि हा महाराष्ट्रद्रोहीपणा थांबवा..! तुम्ही आणि तुमचे नेते यांना आता दिशाभूल करण्याशिवाय कोणतेच काम राहिले नाही. कंत्राटी भरतीवर बुरखा फाटल्यानंतर आता असेच नवीन विषय शोधत रहा आणि तुम्ही फक्त तेच काम करीत रहा.
महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, @supriya_sule
कितीही हा महाराष्ट्रद्रोहीपणा आणि करंटेपणा….
आपल्याच राज्याची प्रगती तुम्हाला सहन होत नाही का हो..??
कधी आयएसआय फंडेड वेबसाईटची माहिती सांगत महाराष्ट्रात विद्वेष पसरल्याचे सांगता, तर कधी महाराष्ट्रात उद्योग येऊनही उद्योग बाहेर…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 27, 2023
ऐका डायमंड बुर्सची संपूर्ण कहाणी…
सुरत डायमंड बुर्स तयार होते आहे हे खरे आहे. पण, सुरत डायमंड बुर्स आणि मुंबईत असलेला भारत डायमंड बुर्स या दोन्हीच्या कार्यपद्धतीत फरक आहे. सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, तर मुंबई हे एक्सपोर्ट हब. या मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही.आता कान उघडे ठेऊन ऐका… इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रावर राज्य केले, तेव्हा हा भारत डायमंड बुर्स ऑपेरा हाऊसमधल्या 5-6 इमारतीत विखुरला होता.
MP Elections : भापपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांचा समावेश
आता तो आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्त्वात बीकेसीत एका ठिकाणी आहे.आता या उद्योगाला देवेंद्रजींनी महापेत 20 एकर जागा दिली आणि आशियातील सर्वांत मोठा ‘जेम्स अँड ज्वेलरी पार्क’तेथे उभा राहतोय.या पार्कसाठी 5 एफएसआय, वीजदरात सवलत, जीएसटीतून दिलासा असे अनेक निर्णय घेतले ते देवेंद्र फडणवीस यांनीच. उद्योग टिकवायला काय करावे लागते ते फक्त देवेंद्रजींनाच ठावूक. ते तुमच्या तर ठायी सुद्धा नाही.
Bharat Jadhav : ‘माझ्यातल्या नटाच्या अस्तित्वासाठी मी…’ भरत जाधव पुन्हा रंगभूमीवर; भुमिकेचीही चर्चा
तुमची स्मरणशक्ती कमी झाली असेल तर मलबार गोल्डची गेल्याच आठवड्यात 1700 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. तनिष्क सुद्धा डायमंड क्षेत्रात गुंतवणूक करते आहे आणि तुर्की डायमंड बुर्स सुद्धा मुंबईत येतो आहे. मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्राची माफी मागाच आणि कृपा करुन महाराष्ट्रद्रोहीपणा करु नका..! असं म्हणत त्यांनी सुळेंना सुनावत जोरदार टीका केली आहे.