Supriya Sule : ‘मोदींच्या काळातच शरद पवारांना पद्मविभूषण’; सुळेंनीही सांगितली जुनी आठवण

Supriya Sule : ‘मोदींच्या काळातच शरद पवारांना पद्मविभूषण’; सुळेंनीही सांगितली जुनी आठवण

Supriya Sule on PM Modi : शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदीना प्रत्युत्तर देत आहेत. जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते भाजपाचा माणूस? रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं

यावेळी पत्रकारांनी त्यांना पीएम मोदी यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारले. त्यावर खा. सुळे यांनी मिश्कील शब्दांत उत्तर दिले. सुळे म्हणाल्या, जयंत पाटील यांच्या पोस्टमध्ये बरीच उत्तरं आहेत. एकतर मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रात आल्यावर ते शरद पवारांचं नाव नेहमीच घेतात. कधी प्रेमानं, कधी टीका करताना. राजकारणात एवढं चालतच, इतना हक तो बनता है. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना मोदी नेहमीच नॅचरल करप्ट पार्टी म्हणायचे. यावेळी मोदींना कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला नाही, असा टोलाही सुळे यांनी लगावला.

काय म्हणाले होते मोदी ?

महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये कृषिमंत्री होते. वैयक्तिकरित्या, मी त्यांचा आदर करतो, परंतु त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांकडून साडेतील लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले, परंतु आपल्या सरकारने सात वर्षांत एमएसपीवर 13.5 लाख कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले, असं मोदी म्हणाले होते.

आव्हाडांचा अजितदादांवर निशाणा

पीएम साहेबांना आपण आधी काय बोललो आहोत हे लक्षात नसावं. असो. पण हे विधान करत असताना आमचे काही जुने साथीदार मंचावर बसले होते. पक्षफुटीच्या आधी हीच लोकं पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचून आमदार, मंत्री झालेत. तीच लोक आज केवळ सत्तेच्या लालसेपोटी बघ्याच्या भूमिकेत राहून गप्प बसली हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं..!  अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली होती.

Jitendra Awhad : ‘हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं..! आव्हाडांच्या निशाण्यावर अजितदादा?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज