Jitendra Awhad : ‘हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं..! आव्हाडांच्या निशाण्यावर अजितदादा?

Jitendra Awhad : ‘हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं..! आव्हाडांच्या निशाण्यावर अजितदादा?

Jitendra Awhad : शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदीना प्रत्युत्तर देत आहेत. जयंत पाटील यांच्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदी काल शिर्डी दौऱ्यावर होते. येथे त्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या लोकार्पणासह विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यांची ही टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांची जिव्हारी लागली. या टीकेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तेथे उपस्थित असलेल्या अजित पवारांवर निशाणा साधला.

पवारांनी ६० वर्षात काय केलं? मोदींच्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर, ट्वीट केला ‘तो’ व्हिडिओ

या संदर्भात आव्हाड यांनी जयंत पाटील यांनी ट्विट केलेला एक जुना व्हिडिओ रिट्विट करत लिहिले, की खालील व्हिडिओ बघितल्यावर मला वाटतं की पीएम साहेबांना आपण आधी काय बोललो आहोत हे लक्षात नसावं. असो. पण हे विधान करत असताना आमचे काही जुने साथीदार मंचावर बसले होते. पक्षफुटीच्या आधी हीच लोकं पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचून आमदार, मंत्री झालेत. तीच लोक आज केवळ सत्तेच्या लालसेपोटी बघ्याच्या भूमिकेत राहून गप्प बसली हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं..! बाकी शेतकऱ्यांच्या बाबत मोदी साहेबांनी बोलावं हा देखील मोठा विनोद आहे. वर्षभर शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसला होता. 750 जास्त शेतकऱ्यांचा जीव गेलाय. दुसरीकडे आमच्या बापाने या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली होती.

मोदी काय म्हणाले होते?

महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये कृषिमंत्री होते. वैयक्तिकरित्या, मी त्यांचा आदर करतो, परंतु त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांकडून साडेतील लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले, परंतु आपल्या सरकारने सात वर्षांत एमएसपीवर 13.5 लाख कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले, असं मोदी म्हणाले होते.

‘PM मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत’; प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या दौऱ्यावर बोट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube