MP Elections : भापपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांचा समावेश

  • Written By: Published:
MP Elections : भापपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांचा समावेश

BJP Campaigners List : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Madhya Pradesh Assembly Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आता भाजपने (BJP) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह, मंत्री राजनाथ सिंह आणि सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे दिली आहेत.

Bharat Jadhav : ‘माझ्यातल्या नटाच्या अस्तित्वासाठी मी…’ भरत जाधव पुन्हा रंगभूमीवर; भुमिकेचीही चर्चा 

स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपने ४० नेत्यांना स्थान दिले असून ते मध्य प्रदेशात प्रचार करणार आहेत. मात्र, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि भोपाळच्या खासदार तथा भाजपच्या फायरब्रँड नेत्या साध्वी प्रज्ञा यांचे नाव या स्टार प्रचारकांच्या यादीत नाही.

स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाचा समावेश?
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या या यादीत पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, व्हीडी शर्मा, योगी आदित्यनाथ, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णवी, अनुराग ठाकूर, देवेंद्र फडणवीस, हिमंता बिस्वा सरमा, कैलाश विजयवर्गीय, केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, फग्गन सिंग कुलस्ते, प्रल्हाद पटेल, एसपी सिंह भगेल, मनोज तिवारी, नरोत्तम मिश्रा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता भाजपचे दिग्गज नेते निवडणूक प्रचारात ताकद पणाला लावणार आहेत. त्यासाठी भाजपने अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि अनेक मुख्यमंत्र्यांवर प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेही मध्य प्रदेशातील भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा असतील. मात्र, मध्य प्रदेशातील स्टार प्रचारकांच्या यादीत शिंदे घराण्याच्या दोन ज्येष्ठ महिला नेत्या यशोधरा राजे आणि राजस्थानच्या भाजपच्या प्रमुख नेत्या वसुंधरा राजे यांची नावे नाहीत. यशोधरा राजे यांनी स्वत:ला निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवले आहे. तर वसुंधरा राजे यांचे महत्त्व कमी होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या यादीत स्थान दिले नाही.

17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार
मध्य प्रदेशात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. भाजपला राज्यात पुन्हा आपली सत्ता स्थापन करण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसला सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढावं लागणार आहे. मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. याआधी पक्ष प्रचार करतील आणि लोकांना त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी आकर्षित करतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज