‘पेंग्विनची उंची अन् कोंबडीचा आवाज’, ठाकरेंच्या टिकेवर नितेश राणे भडकले म्हणाले, “त्यांनी स्वतःचा मुलगा..”

ठाकरे ब्रँड संपला संपला म्हणून जे ओरड घालताहेत हिंदु्त्वाचा हात सोडला म्हणून ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसले आहेत.

Letsupp Image (76)

Nitesh Rane Udhdhav Thackeray

Nitesh Rane replies Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) मंत्री नितेश राणे यांच्यावर अत्यंत (Nitesh Rane) जहरी टीका केली होती. ‘उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कुणासारखे माहिती नाही. अरे तुझा जीव किती, तू बोलतो किती? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? एक कुणीतरी बाप ठरवं आणि मग बोल, अशी टीका त्यांनी केली होती. याच टीकेवर आता मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणे म्हणाले,ज्यांना आम्ही जिहादी हृदयसम्राट म्हणतो त्यांच्याकडून त्यांच्याकडून हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शापच मिळणार. मी हिंदुत्वाचं काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मला बोलणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतंय ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतंय. ज्या बाळासाहेबांनी नेहमी हिंदुत्वाचा पुरस्कार केला त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करतंय. हिंदू समाजासाठी उभं राहतंय हे त्यांना खटकणार. हा खरंतर बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे. उद्धव ठाकरेला हे कळलेलं नाही. ठाकरे ब्रँड संपला संपला म्हणून जे ओरड घालताहेत हिंदु्त्वाचा हात सोडला म्हणून ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसले आहेत.

आदित्य ठाकरेंवरही सडकून टीका

स्वतःचा मुलगा कसा आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला पेंग्विन बोलून काही फरक पडत नाही. स्वतःच्या मुलाची अवस्था आधी पाहा. दिनो आणि दिशाबद्दल माहिती देत आहोत म्हणून टीका केली जात आहे. स्वतःच्या मुलाचं नाईट लाइफ कमीक केलं असतं तर हे टाळता आलं असतं. आदित्य ठाकरेचा आवाज ना बाईचा ना माणसाचा अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या बापाचं नाव लावायची ह्यांना लाज वाटायची. राहुल गांधी स्टेजवर असताना हिंदूहृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी करा. आता उबाठा वर्धापनदिन पाकिस्तानच्या राजधानीतच साजरा झाला पाहिजे असा टोला राणे यांनी लगावला.

“देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही..”, उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

यानंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार प्रहार केला. ठाकरे ब्रँड मोठा केला तो हिंदुत्वाच्या ताकदीवर मोठा केला. सुपारी उद्धव ठाकरेंनी घेतली. उद्धव ठाकरे सुद्धा अघोरी पूजा करतात. कर्जतला फार्महाऊसवर काय पुरलंय ते सांगू का? असा सवाल राणे यांनी केला. धर्मांतर प्रकरण अडीच वर्षात झालं. कोरोनाच्या नावाखाली बंद ठेवलं. भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचा मुद्दा पुढे केला जात आहे. पण, गोगावले यांनी हिंदू पद्धतीनेच पूजा केली. मग कोणत मोठे संकट आलं असा सवाल मंत्री राणे यांनी विचारला.

राज उद्धव ठाकरे एकत्र आले तर..

मुंबई महापालिका जवळ आलेल्या असतानाच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. यावर आज नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. राणे म्हणाले, राज्याच्या हितासाठी ते भांडले नव्हते त्यांचे कौटुंबिक भांडणं होती. लग्नामध्ये येतात एकत्र तुम्हाला विचारून येतात का. एकाकडे शून्य आमदार आणि एकाकडे 20 आमदार काय होणार? असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी या संभाव्य युतीवर उपस्थित केला.

Exit mobile version