Mumbai Municipal Corporation mayoral election postponed due to BJP and Shiv Sena not registered group leader : राज्यातील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा 16 जानेवारीला निकाल लागला. यामध्ये राज्यातील बहुकतांश ठिकाणी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता आली आहे. त्यानंतर 22 जानेवारीला महापौर पदाची आरक्षण सोडत निघाली आहे. तर 31 जानेवारीला राज्यातील महापौर पदाची निवडणूक होणार आहे. मात्र यामध्ये मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाच्या निवडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
PIFF मध्ये ‘तो ती आणि फुजी’ची छाप! सर्वोत्कृष्ट पटकथा आणि अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. कारण बहुमत असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्या युतीच्या दोन्हीही पक्षांची गटनेते पदाची नोंदणीच अद्याप झालेली नाही. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 31 जानेवारीला राज्यातील महापौर पदाची निवडणूक होणार आहे. मात्र यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे.
अभिमानास्पद! राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत कोपरगावची शाळा दिल्लीतील महाअंतिम फेरीत दाखल
त्यामुळे आता मुंबईच्या नव्या महापौरपदाची निवड ही फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर आता महापौर पदासाठी 27 जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्यात येणार होते. मात्र रात्री उशिरा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने ही तारीख देखील पुढे ढकलली जाणार आहे. तसेच मुंबई मनपासाठी भाजप शिवसेनाच एकत्रित गट स्थापन होणार की, नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
