Mumbai Police : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने (Department of Home Affairs) घेतला. ही भरती राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (MSSC) 11 महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाईल. मुंबई पोलिसांत मनुष्यबळाची तीव्र कमतरता असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला. या 3,000 कर्मचाऱ्यांना मुंबई पोलीस दलात ठेवण्यासाठी दरमहा 8.35 कोटी रुपये म्हणजे, वार्षिक 100 कोटी रुपये दिले जातील, असा आदेश गृह विभागाने बुधवारी जारी केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत तज्ञ डॉक्टरांच्या 21 जागांची भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज
गणेशोत्सव संपला असला तरी नवरात्री, रमजान, दिवाळी या सणांमध्ये मुंबईत सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिसांची गरज असते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. याबाबतच आदेश सरकारने 27 जुलैला जारी करून 11 महिन्यांसाठी 3,000 कर्मचार्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यास मान्यता दिली होती. पोलिस दलात 40,623 इतके पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे 10,000 हवालदार आणि चालकांची पदे रिक्त आहेत. पोलीस दलात मनुष्यबळाची एवढी मोठी कमतरता असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तीन वर्षापासून भरतीच नाही
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कोविड महामारी आणि भूतकाळातील काही सदोष निर्णयांमुळे सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. दरवर्षी, जवळपास 1,500 पोलीस कर्मचारी दरवर्षी नियुक्त केले जातात. तथापि, कोविड महामारीमुळे, 2019, 2020 आणि 2021 मध्ये कोणतीही नियुक्ती झाली नाही. तर अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की तीन वर्षांत सुमारे 5,000 कर्मचारी सेवानिवृत्त झाले, परंतु त्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत.
शिवाय, कोविडमुळे 500 हून अधिक पोलीस कर्मचार्यांना आपला जीव गमावला होता आणि त्याच कालावधीत आरोग्य समस्यांना तोंड देणार्या शेकडो लोकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे तत्कालीन डीजीपी आणि नंतर मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांनी ज्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांना मुंबई बाहेर बदली करायची होती, त्यांच्या बहुतांश अर्जांना परवानगी दिली होती.
बहुतांश पोलीस हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ग्रामीण भागात काम करणे अधिक सोयीचे वाटते, विशेषत: त्यांच्या मूळ ठिकाणाच्या जवळ. त्यामुळे, शहराबाहेर बदल्यांसाठी नेहमीच अनेक अर्ज येतात, अशी संख्या एकूण मुंबई पोलिसांच्या 90 टक्क्यांहून अधिक संख्या असते.
एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, गंभीर आणि कायदेशीर कारण असल्याशिवाय, हे अर्ज मंजूर केले जात नाहीत. कारण असं केलं तर मुंबईत तुटवडा निर्माण होईल. तथापि, संजय पांडे यांनी यापैकी अनेक अर्ज मंजूर केले होते, त्यामुळे तेव्हापासून काही हजार कॉन्स्टेबलची कमतरता आहे.
दरम्यान, या सर्व कारणांमुळे, सध्या 44,000 पदांपैकी 10,000 पेक्षा जास्त पदांची कमतरता आहे. गेल्या वर्षी, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17,000 कर्मचार्यांच्या भरतीला मंजुरी दिली होती, त्यापैकी 8,000 पोलीस मुंबईसाठी असणार आहेत. मुंबई पोलिसांची भरती प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असताना, निवड झालेल्यांना नऊ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी जावे लागेल. हे प्रशिक्षण पुढील वर्षीच सुरू होईल. त्यामुळं सध्या कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.