Download App

मुंबई रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 16 गुन्ह्यांचा पर्दाफाश करत चोरट्यांची टोळी गजाआड

मुंबई रेल्वे पोलिसांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 16 गुन्हेही उघडकीस आणले आहेत.

Railway Police busted Gang of thieves : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या चोरट्यांच्या टोळीकडून तब्बल 22 लाख 24 हजार 769 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे वकार आलम तोकीर खान आणि जुगल किशोर ओमप्रकाश विश्वकर्मा अशी आहेत.

खूनाचा बदला खून! आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरचा रक्तरंजित इतिहास

पोलिस (Railway Police) या टोळीतील (Gang of thieves) इतर साथीदारांचा आता शोध घेत आहेत. 13 मे ते 24 मे दरम्यान, प्रवासी आणि तक्रारदार कोइम्बतूर राजकोट एक्सप्रेसच्या डब्यात झोपले असताना, आरोपींनी (Gang of thieves)धारदार शस्त्राने त्यांचे पँटचे खिसे कापले आणि 3.5 लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या, चांदीचे लॉकेट आणि 3.6 लाख रुपये किमतीची रोख रक्कम चोरून नेली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून त्यानुसार कल्याण रेल्वे पोलिस (Railway Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Amol Mitkari : अजित पवार प्रकरणी मिटकरींचा युटर्न! IPS अधिकाऱ्याव केलेलं वक्तव्य घेतलं मागे…

संशयाच्या आधारे पोलिसांकडून तपास
दरम्यान, रात्रीच्या वेळी मुंबईहून येणाऱ्या-जाणाऱ्या मेल-एक्सप्रेसमध्ये होणाऱ्या चोऱ्यांची पद्धत सारखी असल्याचे पोलिसांच्या (Railway Police) लक्षात आले. या प्रकरणात बॅगा आणि पर्स चोरीच्या गुन्ह्यांची (Gang of thieves) नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी ‘चोरीच्या सारख्या पद्धती’चा धागा वापरून त्यानुसार तपास सुरू केला. त्याद्वारे, रेल्वे पोलिसांच्या कल्याण युनिट-3 (गुन्हे शाखा) चे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गुन्ह्याच्या पद्धतीचा अभ्यास करत होते. गुन्ह्याच्या पद्धतीचा आणि वेळेचा अभ्यास करून असा गुन्हा करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिस (Railway Police) घेत होते.

लाडक्या बाप्पाला निरोप : ग्रामदैवत, मानाच्या श्री विशाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

चोरीची 16 प्रकरणे उघडकीस
25 ऑगस्ट रोजी पोलिसांना (Railway Police) एका खास खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आरोपी (Gang of thieves) कल्याण स्टेशनजवळ येणार आहेत. या माहितीवरून पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील शहराच्या हद्दीतून वकार आलम आणि जुगल किशोर यांना अटक केली. पोलिसांना (Railway Police) आरोपींच्या चौकशीत असे आढळून आले की, या गुन्ह्याव्यतिरिक्त त्यांनी इतर अनेक चोऱ्या केल्या आहेत. यानंतर पोलिसांनी (Railway Police) या आरोपींशी संबंधित इतर 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. या चोरीच्या घटना कल्याण, कर्जत, डोंबिवली आणि ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होत्या.

follow us