Download App

Mumbai : ‘मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला, तुम्ही लहान भावावर ठेवला का?’ शर्मिला ठाकरेंचा उद्धवना थेट सवाल

Mumbai News : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळ आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मात्र आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली होती. त्यावर ठाकरे गटाकडून त्यांचे आभार मानण्यात आले होते. यानंतर आता शर्मिला ठाकरे यांनी पुन्हा टीका करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार टोला लगावला. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला. तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का, असा सवाल त्यांनी केला.

शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या, किणी प्रकरणापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत असतात. निदान जो भाऊ तुमच्यासोबत लहानचा मोठा झाला. त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवला असता तर आम्हालाही कधीतरी आभार मानायची वेळ आली असती. तुम्ही ज्या भावासोबत मोठे झालात परंतु, किणी प्रकरणावेळी मदत का केली नाही, या प्रकरणावरून टोमणे मारणं कधी थांबवलं आहे, असे सवाल करत आम्हाला अजून तरी आभार मानायची वेळ आली नाही, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा आदेश! ‘त्या’ वादात पडू नका; निवडणुकीची तयारी सुरू करा

दीड वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीत का गेले होते ?

दरम्यान उद्योजक गौतम अदानीविरोधात ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चात स्वतः उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. या मोर्चावर राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही पलटवार करत अदानींना प्रश्न विचारला म्हणून चमचे का वाजताहेत असा सवाल केला होता. यावर शर्मिला ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन वर्षांपूर्वी अदानी मातोश्री येथे कशासाठी गेले होते याचं उत्तर तुम्ही शोधा. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांचे हात धरले होते का. चांंगले निर्णय घेण्यासाठी त्यांना कुणी अडवलं होतं. धारावीचा पुनर्विकास करायचा होता मग तुम्ही का केला नाही, असे सवाल शर्मिला ठाकरे यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी तुमच्या सरकारच्या काळात विधेयक पास करायचे होते. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस बहुमतात होते त्यावेळी आरक्षण देऊन टाकायचे होते. धारावीचा विकास करायचाच होता मग करून टाकायचा. धारावीच्या विकासकामांचे टेंडर काढून जो कुणी चांगला असेल त्याला काम द्यायचे होते असेही शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या.

follow us