राज ठाकरेंची मुलगीही सोशल मीडियावर ट्रोल? शर्मिला ठाकरे म्हणाल्या..,

राज ठाकरेंची मुलगीही सोशल मीडियावर ट्रोल? शर्मिला ठाकरे म्हणाल्या..,

Sharmila Thackeray : मागील काही दिवसांपासून देशातील अनेक दिग्गज नेते, कलाकारांचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यावर केंद्र सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, अद्यापही डीपफेक प्रकरणे थांबलेली दिसून येत नाहीत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुलीलाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Animal Box Office Collection: रणबीरच्या ‘अॅनिमल’ची छप्परफाड कमाई! नऊ दिवसांत 660 कोटींचा गल्ला

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, माझ्या मुलीलाही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर युट्यूबवर अनेक वाटेल ते मेसेजेस येत असतात. या प्रकरणावर मी अनेकदा पोलिस आयुक्तांकडे तक्रारही केली. तक्रार केल्यानंतर संबंधित युवकाला अटकही करण्यात आली. मात्र, त्यापुढे काहीही होत नाही. अशी प्रकरणे थांबवण्यासाठी राज्याच्या विधानसभेने कायद्यात काहीतरी बदल केला पाहिजेत तरच काहीतरी होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरेंनी दिली आहे.

Mumbai : स्वतःचंच अपहरण, वडिलांकडून खंडणीची मागणी; 30 हजारांसाठी मुलाचा प्रताप

मागील काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या नावाने एक व्हिडीओ व्हायरल होत होता. नंतर रश्मिकाही डीपफेकच्या जाळ्यात अडकल्याचे तिने स्वतः सांगितले होते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलीलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. डीपफेक व्हिडीओ आणि कमेंट्सवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चिंता व्यक्त केलीयं.

कांदा प्रश्नी फडणवीसांची केंद्राच्या दरबारी धाव : मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार?

माझ्या मुलीला सुद्धा वाटेल तसे मेसेज सोशल मीडियावर येत असतात. शर्मिला ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. डीपफेक व्हिडीओ आणि सोशल मीडियावरून येणाऱ्या कमेंट्सवर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ही माहिती दिली. तसेच देशातील ब्रिटिशकालीन कायदे तकलादू असून हे कायदे बदलले पाहिजे, अशी मागणीही शर्मिला ठाकरे यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube