Download App

तीन मजली इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू, 7 जण गंभीर

नवी मुंबईमध्ये इमारती कोसळून अनेकांचा बळी जात असल्याच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नेरुळमधील सारसोळे गावातली तीन मजली कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटेनत 7 जण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर , काय आहेत लक्षणं?

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने इमारतींच्या छतांवर पावसाचं पाणी साचत आहे. अशातच इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक तळमजल्यावर कोसळला आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 ते 7 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

‘चांद्रयान 3’ चंद्रावर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदींचे पहिले विधान, अभिमानास्पद…

ही घटना नेरुळ सेक्टर 06 मधील तुलसी भवन प्लॉट नंबर 313 इमारतीमध्ये घडली आहे. इमारतीच्या C विंगचा स्लॅब अचानकपणे कोसळला आहे. इमारतीचा स्लॅब कोसळ्यानंतर घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. यावेळी अग्निशमन दल, महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत 6 ते 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना नजिकच्या डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags

follow us