Download App

Mumbai Train Firing : …म्हणून कॉन्टेबल चेतनने गोळी झाडली? महत्त्वाची अपडेट समोर

  • Written By: Last Updated:

Mumbai Train Firing Update : मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली असताना, आता या घटनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. घडलेल्या या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, ही घटना बदलीच्या तणावातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत टिव्ही-9 हिंदीने वृत्त दिले आहे.

Dhananjay Munde : …म्हणून पंकजा मुंडेंना पराभूत करू शकलो; बंधू धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण

प्रकाशित वृत्तानुसार, गोळीबार करणारा कॉन्स्टेबल चेतन त्याच्या बदलीमुळे संतापला होता तसेच तो तणावातही होता. यात तणावाच्या स्थितीत चेतनने गोळीबार केला. ज्यात एएसआयसह एकूण 4 जणांचा मृत्यू झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल चेतनची गुजरातमधून मुंबईत बदली झाली होती. चेतनचे कुटुंब गुजरातमध्येच राहत होते, त्यामुळे तो खूप मानसिक त्रासात होता.

नेमकी घटना कधी घडली?
मुंबई-जयपूर एक्स्प्रेस ट्रेनने पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास चेतनने गोळीबार केला. या गोळीबारात एएसआय टिकाराम शहीद झाले, नंतर कॉन्स्टेबलने तेथे उपस्थित काही प्रवाशांवरही गोळीबार केला ज्यात तिघांचा मृत्यू झाला असून, दुपारी तीन वाजता आरोपी चेतनला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Mumbai Train Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, एका पोलीस अधिकाऱ्यांसह 4 प्रवाशांचा मृत्यू

रेल्वे गोळीबारात काय झाले?
ही गोळीबाराची घटना मुंबई-जयपूर एक्स्प्रेसच्या (ट्रेन क्रमांक- 12956) बी-5 बोगीमध्ये घडली. कॉन्स्टेबल चेतनने एएसआय टिकाराम आणि इतर ३ प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. गोळीबार झाला तेव्हा ट्रेनने पालघर ओलांडले होते.

गोळीबारानंतर कॉन्स्टेबलने ट्रेनमधून उडी मारली

पश्चिम रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पालघर स्थानक ओलांडल्यानंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने चालत्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्याने आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या. त्यानंतर तो दहिसर स्थानकाजवळ ट्रेनमधून उतरला मात्र, त्याला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे.

Tags

follow us