SC Rejected Petition For Senate Elections : सिनेट निवडणुकांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. हायकोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. (Senate Elections) यावर सुनावणीवेळी कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
युवा सेना उच्य न्यायालयात
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधरांच्या जागांसाठी निवडणुकीला स्थगिती द्यावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र स्टुडंट यूनियननं धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधर निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आदेशानं घेण्यात आला होता. मात्र, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वातील युवा सेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आम्ही यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही; ठाणे पोलिसांनी पाच मिनीटात पत्रकार परिषद आटोपली
मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला तडाखा देत ही निवडणूक ठरलेल्या तारखेला घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. मात्र, प्रशासकीय कारण सांगून विद्यापीठानं 24 तारखेला मतदान घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार उद्या मतदान होणं अपेक्षित आहे. त्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
आशिष शेलारांची टीका
सिनेट निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार हे विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचे हित जोपासणारे असून, त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासला जातोय आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. तर महाविकास आघाडीतील प्रत्येक जण मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.