‘एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीही पाहिलेले नव्हते’, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

  • Written By: Published:
‘एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीही पाहिलेले नव्हते’, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

Aditya Thackeray On Eknath Shinde : महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री कधी पाहिलेले नव्हते. अशी टीका राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) देखील जोरदार हल्लाबोल केला.

आम्ही भाजपाच्या राजवटीत 10 जागा जिंकल्या. त्यांना वाटले काहीतरी गडबड करून जिंकू, मात्र आम्ही 10 पैकी 10 जाग जिंकलो. असेही यावेळी ते म्हणाले. तसेच मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द का? करण्यात आली असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज आमचा विजय निश्चित झाला आहे. एवढे घाबराट डरपोक सीएम महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. आम्ही भाजपाच्या राजवटीत 10 जागा जिंकल्या त्यांना वाटले काहीतरी गडबड करून जिंकू, मात्र आम्ही 10 पैकी 10 जाग जिंकलो. उद्या 22 सप्टेंबरला निवडणूक होणार असताना काल रात्री अचानक पत्रक आले निवडणूक रद्द झाली. ही निवडणूक का स्थगित केली? असं ते म्हणाले.

तसेच आजू बाजूच्या हाउसिंग सोसायटीची निवडणूक पण रद्द केली. सीएमना अगोदर d लावावा लागेल d म्हणजे डरपोक. राज्यात चार वर्षात कोणत्याच स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्या नाहीत मिंधे आणि भाजपच्या मनात खूप भीती बसली आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

तसेच या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वन नेशन वन इलेक्शनवरून (One Nation One Election) मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांना शिक्षणातील काय कळते, वन नेशन वन इलेक्शन म्हणतात पण यांना चार राज्याचे निवडणुका एकत्र घेता येत नाहीत आणि हे सर्व निवडणुका एकत्र घेणार? अशी टीका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.

श्रीगोंद्याच्या जागेसाठी आघाडीत रस्सीखेच…जगताप की पाचपुते कोणाला मिळणार संधी?

तसेच मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द का केली? कुठे काही घडले का? तुम्ही निवडणूक घेऊ शकत नाही मग तुम्ही कुलगुरू म्हणून कसे बसता? मिंधे तरुण- तरुणीच्या आवाजाला घाबरत आहेत असं देखील यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube