ऐन विधासभेपूर्वी भाजपला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी…

  • Written By: Published:
ऐन विधासभेपूर्वी भाजपला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी…

Bhaskarrao Patil Khatgaonkar : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर भापजला नांदेड (Nanded) जिल्हयात मोठा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे नातेवाईक माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांनी आज आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

‘…तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला’; नाना काटे बंडखोरीच्या तयारीत? 

अशोक चव्हाण यांचे दाजी भास्करराव पाटील खतगावकर हे कॉंग्रेसमध्ये येणार अशी गेल्या काही दिवसापांसून चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षपव्रेश सोहळा झाला. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण आणि मीनल पाटील खतगावकर यांनीही पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

मोठी बातमी : मोदी सरकारला मुंबई HC दणका; फॅक्ट चेक युनिट स्थापनेचा नियम रद्द करण्याचे निर्देश 

2021 च्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी, भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या घरवापसीमुळे देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भापजने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले, पण खतगावकरांच्या पदरात काही पडलं नाही, त्यामुळं त्यांनी कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. खतगावकर यांच्या या निर्णयाचा भाजपला मोठा धक्का बसला.

डॉ.मीनल खतगावकरांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता…
डॉ.मीनल खतगावकर या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून आहेत. लोकसभेसाठी त्या भाजपकडून इच्छुक होत्या. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. विधानपरिषदेतही संधी न मिळाल्याने त्यांनी नायगाव मतदारसंघातून तयारी सुरू केली
दरम्यान, आता नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातून मीनल पाटील खतगावकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube