मुंबई शहरात रोज अनेक लोक येत जात असतात. (Mumbai) या शहरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज शेकडो विमानांचे उड्डाण होते. हे विमानतळ एक दिवसजरी बंद राहिले तर प्रवाशांची मोठी अडचण होते. दरम्यान, आता हे विमानतळ 7 मे रोजी काही तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 7 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तस बंद असणार आहे. 7 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण सहा तासांसाठी हे विमानतळ बंद असेल. या विमानाचे दोन्ही रनवे बंद असतील. पावसाळा सुरू होण्याआधी या पाच तासांत विमानतळाच्या डागडुजीचे काम केलं जाणार आहे.
मुंबई-पुणे मार्गावर मिसिंग लिंक; थांबल्यास होणार कारवाई, पोलिसांचे आदेश काय?
या सहा तासांत कोणत्याही विमानाचे टेकऑफ होणार नाही. तसेच कोणतेही विमान या विमातळावर उतरणार नाही. विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार विमानतळावरील 09/27 आणि 14/32 रनवेवर दुरुस्तीचे हे काम केले जाईल. प्रवासी तसेच, विमानातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विमानतळ दुरुस्तीचे हे काम खूप गरजेचे आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
विमानतळाच्या दुरुस्तीचे नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. म्हणजेच सहा महिन्यांपूर्वीच देशातली तसेच जगभरातील एअरलाईन्सना 7 मे 2026 रोजी विमानतळाच्या डागडुजीचे काम केले जाईल, असे सांगण्यात आले होते. ऐनवेळी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून सर्व विमानवाहतूक कंपन्यांना या कामाची पूर्वसूचना देण्यात आली होती. नियोजनानुसार आता हे विमानतळ 6 तासांसाठी बंद असेल.
दरम्यान, या सहा तासांत डागडुगीचे काम युद्धपातळीवर केले जाईल. आधुनिक यंत्र तसेच कुशल कामगार यांच्या मदतीने हे काम केले जाणार आहे. भविष्यात विमान प्रवासात कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून हे काम केले जात आहे.
