Download App

Nana Patole : गडबड आघाडीत नाहीतर सरकारमध्येच…; दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळे ठेवून

Nana Patole : महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड नाही. खरी बडबड तर शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारमध्येच आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पुण्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar)आणि अजितदादांच्या गुप्त बैठकीवरुन महाविकास आघाडीत गडबड सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्यावर नाना पटोलेंनी (Nana patole)आपण एकत्र असल्याचे सांगितले आहे.

‘तुम्हाला नेमकी अपेक्षा काय?’; पवारांची पाठराखण करीत आव्हाड पत्रकारांवरच चिडले…

महाराष्ट्रामधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पूर्ण ताकत लावण्याचा आमचा प्लॅन आहे. त्याचा फायदा आमच्या इंडियाला होणार आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

शरद पवारांना भाजपची ऑफर खरी की खोटी? रोहित पवारांनी सत्य सांगितलं….

कॉंग्रेसच्या नेत्यांकडूनही टीका करण्यात आली. त्यावर नाना पटोले यांनी सांगितले की, शरद पवारांच्या भूमिकेवर कॉंग्रेसला संभ्रम नाही. जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे, तो आम्ही सांगितला आहे. मात्र शरद पवारांच्या भूमिकेबद्दल कॉंग्रेसला कोणत्याही प्रकारची शंका नसल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.

महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही, आम्ही एकत्रच निवडणुका लढवणार आहोत. त्यामुळे आघाडीत कसलीही गडबड नाही पण सरकार मध्ये गडबड आहेदोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री खुर्चीवर डोळे ठेवून आहेत. या सरकारमध्ये सत्तेत बसून मलई खाणे सुरु आहे. एक उपमुख्यमंत्री दिल्लीत एक उपमुख्यमंत्री माहित नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आहेत, राज्य वाऱ्यावर सोडले आहे. शेतकरी आत्महत्या करतात. तरुण आत्महत्या करतात. 218 लोकांनी पुण्यात शहरात आत्महत्या केली. लोकं मेली तरी चालेल सत्ता मात्र हवी, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केली.

Tags

follow us