शरद पवारांना भाजपची ऑफर खरी की खोटी? रोहित पवारांनी सत्य सांगितलं….

शरद पवारांना भाजपची ऑफर खरी की खोटी? रोहित पवारांनी सत्य सांगितलं….

Rohit Pawar : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय जनता पक्षाने शरद पवार यांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिली होती, असं विधान चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाष्य केलं. पवार साहेबांनी महाराष्ट्र धर्म स्वीकारला, संघर्ष स्वीकारल्याचं सांगत त्यांनी चव्हाण यांच्या विधानाचं खंडन केलं.

आज आमदार रोहित पवार माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, चर्चा झाली की, नाही झाली हे सांगता येत नाही. पण, एखादी बातमी आली म्हणून खरं समजून कसं चालेलं. आणि हे खरं असेल तर जनतेनं हे समजून घ्यावं की, पवार साहेबांना पदं ऑफर करूनही त्यांनी महाराष्ट्र धर्म स्वीकारला, संघर्ष स्वीकारला. शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा विचार स्वीकारला. संघर्ष करत महाराष्ट्राच्या अस्मिता जपण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळं कोण काय छापतं, याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला सघर्ष करायचा आहे. शरद पवार हे संघर्ष करणार आहेत, असं रोहित यांनी सांगितलं.

शरद पवारांना सोबत आणले तरच अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी अट मोदींनी अजित पवारांसमोर ठेवल्यानंच ते सातत्याने शरद पवारांची मनधरणी करत असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, वडेट्टीवारांचं ते वैयक्तीक मत असेल. बैठक झाली नाही, नाही झाली हे ठाऊक नाही. ते जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत नाही, ते त्या गुप्त बैठकीत नव्हते, त्यामुळे त्यांनी असं बोलण्याची गरज नसल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.

उद्या शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’; राधाकृष्ण विखे पाटलांचे शक्ती प्रदर्शन 

राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेना-कॉंग्रेस येत आहेत. याबाबत विचारलं असता, ते म्हणाले मागील अनेक वर्षांपासून विरोधात असलेले पक्ष एकत्र आले. सर्वांना माहिती आहे की, सोबत राहिल्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येताय मात्र तसं नाही, शरद पवार महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात आहे. ३० वर्ष एकमेकांच्या विरोधात असणारे पक्ष एकत्र आले. त्यामुळं त्यांच्यात थोडा संभ्रम असणार, पण सगळे नेते लोकांमध्ये जातील, तेव्हा सर्व संभ्रम दूर होतील. शरद पवार १७ ऑगस्टला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

महाविकास आघाडीतील अनेक पक्ष जागांवर दावा सांगत आहेत. याविषयी विचारले पवार यांनी सांगितलं की, प्रत्येक निवडणुकीच्या आधी हेच होतं. कारण, प्रत्येक पक्षाची जास्तीत जास्त जागा मिळवण्याची इच्छा असते. आताच होत असं नाही. प्रत्येक विधानसभा निवडुका आधी दावा हा २८८ विधानसभा मतदार संघावरच केला जातो. हा निगोशिएशनचा भाग आहे. हे दावे केले जातात. त्यानंतर चर्चा होते. मार्ग काढले जातात. आता केलेले दावे हे काही अंतिम दावे नसतात. आता वंचित पक्ष हा २८८ जागांवर दावा करतो. पण, त्यांच्या भूमिकेमुळं भाजपला मदत होते. त्यामुळं सर्वांनी आघाडीसोबत यावं, असं रोहित पवार म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube