Download App

अमित ठाकरेंकडून मारहाण, माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा गंभीर आरोप

Amit Thackeray : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) मंगळवारी माथाडी कामगार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला आहे. खारघरमधील (Kharghar)मेडिकव्हर रुग्णालयासमोर हा राडा झाला आहे. यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव (Mahesh Jadhav)यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महेश जाधव यांना अमित ठाकरे यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Nashik Loksabha : ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी | LetsUpp Marathi

माथाडी कामगार नेते महेश जाधव (Mahesh Jadhav) यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आपल्याला शिवीगाळ करुन जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप यावेळी जाधव यांनी केला आहे.

Share Market : अखेरीस गेम पलटला; सेन्सेक्समध्ये वाढ, गुंतवणूकदारांची चांदी

महेश जाधव यांनी राज ठाकरेंची टीम खंडणी गोळा करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जाधव हे मनसे माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत. पण आता जाध यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. आता सध्या ते खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याचवेळी त्या परिसरात उपस्थित असल्या मनसे सैनिकांना महेश जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच मारहाण केली.

मारहाण होत असताना एका सोसायटीमध्ये आश्रय घ्यायला गेले असता त्यावेळी सोसायटीच्या सिक्युरिटी रुमच्या काचा माथाडी कामरांनी फोडल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच दोन्ही गटात मोठा राडा झाल्याने खारघरमध्ये काही काळासाठी मोठं तणावाचं वातावरण झाल्याचं पाहायला मिळालं.

follow us