नवाब मलिकांची भूमिका जाहीर; मुंबईचे अध्यक्षपद आले धोक्यात

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) दीड वर्षांनंतर जामीनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर नबाव मलिक यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) दोन्ही गटाचे नेते गेले होते. पण नवाब मलिक यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर मलिक कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आता नवाब मलिक यांनी […]

Nawab Malik

Nawab Malik

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) दीड वर्षांनंतर जामीनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर नबाव मलिक यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) दोन्ही गटाचे नेते गेले होते. पण नवाब मलिक यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर मलिक कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आता नवाब मलिक यांनी आपली भूमिका जाहीर केल्याची माहिती मिळत आहे. मलिकांनी शरद पवार गटाला (Sharad Pawar) पाठिंबा दिला आहे.

आतापर्यंत मलिकांची ओळख शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून आहे. मलिक तुरुंगातून बाहेर पडताच त्यांचे अजित पवार (Ajit Pawar) गटासह शरद पवारांच्या गटातील नेत्यांनी जंगी स्वागत केले होते. दरम्यान, मलिकांसाठी त्यांच्या मुलीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मलिकांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी आराखड्यास मान्यता, केंद्राचा मोठा निर्णय

दरम्यान, नवाब मलिक यांनी आपला शरद पवार यांना जाहीर केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरुन मुक्तता केली आहे. आता या पदावर लवकरच भुजबळ समर्थक शिवाजीराव नलावडे यांची नियुक्ती होणार असल्याचे बोलले जात आहे.

‘ठरवलं… खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी’; रोहित पवारांचा हसन मुश्रीफांना इशारा

शरद पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे ईडीपुढे झुकले नाहीत तर परिस्तथितीला सामोरे गेल्याचे वारंवार सांगितले आहे. कोल्हापूर येथीही शरद पवार यांनी त्यांचे नाव घेत हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली होती.

Exit mobile version