मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) ई- मेलवरुन (Email) मुंबईवर हल्ला (Mumbai) करण्याची धमकी देण्यात आली. ई- मेल करणाऱ्याने तालिबानचं नाव घेत धमकी दिली. मुंबईसह इतर शहरांवर देखील हल्ला करणार असल्याचे या मेलद्वारे सांगण्यात आले. एनआयएने याची माहिती मुंबई पोलिसांना (Police) दिली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिले. यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिस तपासाला सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ई-मेल आयडीवर हा मेल आला. मेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. ईमेल करणाऱ्याने तालिबानी असल्याचा दावा केला. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा मेल करणाऱ्या व्यक्तीने केला. धमकीच्या मेलची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि इतर तपास यंत्रणा याचा शोध घेत आहेत. मेल कोणी पाठवला ? नेमका मेल कुठून आला, याचा शोध तपास यंत्रणा करत आहेत. मुंबईसह देशात काही शहरात अलर्ट जारी करण्यात आला.
सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेनंतर सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री करण्यात आले. हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख नेता आहे. तालिबाननमध्ये हक्कानीचे नेटवर्क मजबूत आहे. यात अमेरिकेची एजन्सी एफबीआयने हक्कानीविषयी माहिती देणाऱ्याला १० मिलिअन डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आले.