Download App

संजय राऊत हिजाब घालून देशाबाहेर पळून जातील; नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane On Sanjay Raut : मुंबईमधील कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुजीत पाटकर म्हणजे संजय राऊत यांचा जो काही पैसा, व्यवहार आणि जे काही काळे धंदे संजय राऊतचे चालू असतात, त्या सगळ्यांचा चेहरा म्हणून सुजीत पाटकरला पुढे ठेवलं जातं. सुजीत पाटकरला अटक होणं म्हणजे, संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहात नाही, राऊत आपल्याला लवकरच आर्थर रोड जेलमध्ये दिसतील, त्याचबरोबर संजय राऊत हिजाब घालून देश सोडून जाईल, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवावी, असा थेट इशाराच आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना दिला आहे.(nitesh rane criticise on sanjay raut Sujit patkar arrested covid scam Mumbai)

‘महाराष्ट्र भूषण’चा वाद चिघळला! फडणवीसांना घेरत जयंत पाटलांनी केली ‘ही’ मागणी

दुसऱ्यांवर जे काही भ्रष्टाचाराचे आरोप करतात, हा उद्धव ठाकरेंचा कामगार, त्याला आतमध्ये जाण्याची वेळ आली आहे. माझी मागणी असेल की, आज सकाळपासून संजय राजाराम राऊत कुठेही दिसलेला नाही. तो फरार होऊ शकतो. देश सोडून जाऊन शकतो. त्याच्यावर लुकआऊट नोटीस काढली पाहिजे. पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. कदाचित तो हिजाब घालून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असेही आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Irshalwadi Landslide : दरड का कोसळली? वाचा तज्ज्ञांचे प्राथमिक विश्लेषण

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. कोविड घोटाळ्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. डॉ. किशोर बिचुले व सुजित पाटकर हे दोघे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना कोविड घोटळ्या प्रकरणी ईडीने अटक केली आहे.

मुंबईमधीलजम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी काही खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्यामध्ये लाईफलाईन नावाची एक कंपनी होती. ही कंपनी सुजित पाटकर यांची असल्याचा ईडीचा आरोप आहे. या कंपनीने कोविड सेंटर चालविण्याचे कंत्राट घेतले होते. या कंपनीने जे डॉक्टर्स पेपरवर दाखविले होते तसेच जी यंत्रणा दाखवली होती ती अस्तित्वातच नव्हती असे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

डॉ. किशोर बिचुले हे बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे इन्चार्ज होते. यांच्यावर आरोप असा आहे की, जी डॉक्टर्स किंवा नर्स इथे काम करत नव्हते. त्यांचे बिल्स लाईफलाईन मॅनेजमेंटमार्फत मुंबई महापालिकेला देण्यात आले. त्यानंतर महापालिकेकडून ती बिल्स देण्यात आली. डॉ. किशोर यांच्याकडून खोटे बिल्स तयार करण्यात आले व ते महापालिकेकडून घेण्यात आले. त्यानंतर आता या दोघांना अटक केली असून आता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Tags

follow us