Download App

लालबागच्या राजाला माझा अखेरचा सलाम…; नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या क्लीपमध्ये नेमकं काय?

  • Written By: Last Updated:

Nitin Desai Audio Clips : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑडिओ क्लीप्स रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. ज्यात त्यांनी काही व्यावसायिकांची नावे घेतली आहे. या सर्व क्लिप्स पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतल्या असून, त्यातील काही महत्त्वाचा तपशील समोर आला आहे.

नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !

लालबागच्या राजाला माझा अखेरचा सलाम 

देसाईंनी आत्महत्येपूर्वी एकूण 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. यातील एका क्लिपमध्ये देसाईंनी ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ असे म्हटले आहे. लालबागचा राजा आणि देसाईंचे अतिशय जवळचे नाते होते. दरवर्षी देसाई लालबाग राजाच्या सजावटीचे काम करत असे. परंतु, त्यांच्या अकाली निधनाने यावर्षी हे काम अपूर्ण राहणार आहे. याशिवाय अन्य काही क्लिपमध्ये देसाईंनी कर्जत येथील स्टुडिओ कुणालाही देऊ नका असे आवाहन राज्य सरकारला केल्याचे सांगितले जात आहे.

एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा

याशिवाय अन्य ऑडिओ क्लिपमध्ये देसाईंनी त्यांचा कर्जत येथील स्टुडिओ कुणालाही देऊ नये असे आवाहन राज्य सरकारला केले आहे. तसेच राज्य शासनाने एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन त्या ठिकाणी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

नितीन देसाईंसोबत नेमकं काय घडलं?

नितीन देसाई मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीहून मुंबईत परतले होते. यानंतर ते पहाटे अडीचच्या सुमारास कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी तेथील त्यांच्या एका कर्मचाऱ्याला काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्याचे सांगितले. तसेच त्या सकाळी येऊन संबंधितांना देण्याचे सांगितले. सकाळी संबंधित कर्मचारी स्टुडिओमध्ये दाखल झाल्यानंतर देसाईंनी आत्महत्या केल्याचे समोर आले.

‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवरच स्वत:ला संपवलं; धनुष्यबाणाचं टोकं अन् समोर.., प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं स्टुडिओतील चित्र

कर्जाचा डोंगर अन् टोकाचं पाउलं

देसाई यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणची पोलीस चौकशी सुरू असून, त्यातून अधिक माहिती समोर येईल. देसाई यांच्यावर 250 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह कर्जाची एकूण रक्कम 250 कोटी झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण आला होता. याच ताणतून त्यांनी जीवनयात्रा संपवल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us