North Indians Beaten By Marathi People In Dombivali : डोंबिवलीत (Dombivali) नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे मराठी विरुद्ध इतर भाषांवरील वाद (North Indians Beaten By Marathi People) पुन्हा एकदा तीव्र झालाय. जुनी डोंबिवली परिसरात दोन तरुणींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांना “एस्क्युज मी” असं म्हटलं. याच मुद्द्यावरून वाद झाला अन् काही वेळातच हे प्रकरण इतके वाढले की, या मुलींना मारहाण (English Speaking) करण्यात आली. या महिलेला इंग्रजीत बोलल्यामुळे “मराठीत बोला” असं सांगून बेदम मारहाण झालीय.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भाषेवरून झालेला वाद शिवीगाळ आणि शारीरिक हल्ल्यापर्यंत कसा पोहोचला, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक संतापले आहेत. विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळतंय. मारहाण झालेल्या दोन्ही तरूणींनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनिल पवार, बाबासाहेब ढबाळे आणि रितेश ढबाळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोग्य विभागाला जाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कारवाईला सुरुवात
जुनी डोंबिवली येथील तक्रारदार मैत्रिणीसोबत सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गाडीवरुन घराकडे परतत होते. त्याचवेळी विरोधक पत्नीसोबत इमारतीबाहेर उभे राहून भांडत होते. त्यावेळी तक्रारदार तरूणींनी त्यांना रस्त्यातून बाजूला होण्यासाठी ‘एक्स्युज मी’ म्हटलं. यावरून तक्रारदार अन् त्यांच्या बहिणीला बेदम मारहाण करण्यात आली. तिन आरोपींविरोधात अदखपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
राज ठाकरेंची भूमिका
या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अलिकडेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पाडवा मेळाव्यात मराठी भाषेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. राज्यात मराठीला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये लावलेले हिंदी आणि इंग्रजी पोस्टर्स फाडले आणि कर्मचाऱ्यांशी वादही घातला.
काळिमा फासणारी घटना! उपचारासाठी आलेल्या मुलीवर डॉक्टरकडूनच अत्याचार
मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की, मराठी भाषेसाठी आवाज उठवणं चुकीचं नाही. परंतु, कायदा हातात घेणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. जर कोणतीही व्यक्ती किंवा संघटना हिंसाचारात सहभागी असेल किंवा इतरांना धमकावत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.