Dombivali MIDC मध्ये पुन्हा अग्नीतांडव; भीषण आगीत अनेक जण अडकल्याची शक्यता
Dombivli MIDC Fire afraid of Many people trapped : नुकतीच घडलेली डोंबिवली एमआयडीसीतील ( Dombivali MIDC ) आगीची घटना ताजी असताना याच डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यावेळी या एमआयडीसीतील फेज टू मधील इंडो अॅमिनीज या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. तसेच या आगीमध्ये अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन; वाचा यापूर्वीच्या A टू Z तारखा
या स्फोटांचे आवाज एवढे मोठे होते. त्यामुळे राहीवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र या कारखान्याला ही आग का लागली? याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कारखान्यातून येणारा काळा कुट्ट धूर आणि मोठेच्या मोठे आगीचे लोट यामुळे या आगीचं रौद्ररूप दिसत आहे. तसेच आजूबाजूला नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
Modi 3.0 : PM मोदींचे मंत्रिमंडळ किती शिकलेले? जाणून घ्या, प्रत्येक मंत्र्याची शैक्षणिक पार्श्वभूमी
दरम्यान काही दिवसांपूर्वीच याच डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता. त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्याने प्रशासन आणि व्यवसायिकांकडून कर्मचाऱ्यांसह आसपासच्या परिसराची खबरदारी घेतली जाते आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यामध्ये डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता (Malti Mehta)यांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police)त्यांना मेहेरधाम परिसरातील पेठ रोड येथून अटक केली होती. मुख्य आरोपी या कंपनीच्या मालक मालती मेहता आहेत. त्यांना आता पोलिसांनी अटक केली आहे.