Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटप्रकरणी मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक

Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटप्रकरणी मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता (Malti Mehta)यांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police)त्यांना मेहेरधाम परिसरातील पेठ रोड येथून अटक केली आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकजन त्यात जखमी देखील झाले आहेत. यामध्ये मुख्य आरोपी या कंपनीच्या मालक मालती मेहता आहेत. त्यांना आता पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Accident वर रॅप व्हिडीओ करणारा समोर; अल्पवयीन मुलाच्या आईनेही दिलं होतं स्पष्टीकरण

कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण स्फोटामध्ये मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे.

विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात आणखी दोन कलम वाढविले

या स्फोटाच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. काही दिवसांपासून मालती मेहता या अटक होणार या भीतीने त्या लपून बसल्या होत्या. नुकत्याच मालती मेहता या नाशिकमध्ये आपल्या नातेवाईकांकडे लपून बसल्यची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सुत्रे फिरवून मालती मेहता यांना अटक केली आहे.

डोंबिवली एमआयडीसीमधील स्फोट प्रकरणातील पहिली अटक झाली आहे. अमुदान कंपनीच्या स्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच काही दिवसांपासून मालती या फरार होत्या. मात्र त्यांची पोलिसांना माहिती मिळताच गुरुवारी नाशिक गुन्हे शाखेची एक टीम आणि ठाणे गुन्हे शाखेच्या टीमने एकत्रितपणे ही कारवाई करत मालती मेहता यांना अटक केली आहे.

डोंबिवली एमआयडीसीमधील स्फोटामधील मृतांची संख्या ही 11 वर पोहोचली आहे. आज सकाळी देखील बचाव पथकाला तीन जणांचे मृतदेह या ठिकाणी आढळले आहेत. त्याचबरोबर आणखी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या भागात अजूनही शोध मोहीम सुरु आहे.

अमुदान कंपनीतील बॉईलरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच इतर कंपन्यांमध्ये देखील ही आग पसरली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, तीन ते चार किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे आपण या स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज लावू शकता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज