BJP Office Fire : मोठी बातमी! भाजप कार्यालयाला आग

BJP Office Fire : मोठी बातमी! भाजप कार्यालयाला आग

BJP Office Fire : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार दिल्ली भाजपच्या कार्यालयाला (Delhi BJP Office) आग लागली आहे. दिल्लीमधील पंडित पंत मार्गावर असलेल्या भाजपच्या कार्यालयाला आग लागली असून घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ऑफिसला आग लागली. दुपारी 4.25 च्या सुमारास पंडित पंत मार्गावर असलेल्या भाजपच्या कार्यालयाला आग लागल्याची माहिती दिल्ली अग्निशमन सेवेला मिळाली होती. त्यांतर घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. या आगीत जीवित वा वित्तहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

T20 World Cup 2024 मध्ये टीम इंडियासाठी धोका ठरणार ‘हे’ तीन भारतीय खेळाडू

दिल्लीच्या आयटीओजवळील आयकर विभागाच्या कार्यालयात देखील मंगळवारी आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना खूप वेळ लागला होता.

माहितीनुसार, या आगीत एका विभाग अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता तर सात जण जखमी झाले होते. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 21 गाड्या पाठवण्यात आल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज