Download App

Pahalgam Terror Attack : राष्ट्रवादी काँग्रेसचं काळ्या फिती लावून मूक आंदोलन…

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याप्रकरणी (Pahalgam Terror Attack) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महात्मा गांधींच्य पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आलंय. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. देशातील राजकीय, कला क्षेत्रातूनही संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केलायं.

पाणी गळती रोखा, पाण्याचा हिशोब ठेवा, ‘त्या’ गावांचा सर्वे करा; विखे पाटलांचे प्रशासनाला आदेश

तटकरे म्हणाले, याआधी हल्ले झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलेलं आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार चोख उत्तर देईलच, यात काहीही संदेह नाही. दहशतवाद्यांचं पुन्हा धाडस झालं नाही पाहिजे, या पद्धतीने चोख उत्तर देण्यात येईल, असं खासदार सुनिल तटरे म्हणाले आहेत.

गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स 1 लाखांवर पोहोचणार; जाणून घ्या विश्लेषकाचा अंदाज

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून टीका केल्या जात आहेत. टीका-टिप्पणी करणं सोपं आहे, अशा घटनांमध्ये केंद्र सरकार आपल्या संपूर्ण यंत्रणेसह कारवाई करत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडतात, त्या निंदनीय आणि चीड आणणारी आहे. या घटनकडे राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा एकसंघ भारत म्हणून पाहावं, असं सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.

मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढला; उष्मघाताने वृद्ध शेतमजुराचा मृत्यू, तापमानाचा अकडा ४३ वर

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रुपालीताई चाकणकर,माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार सुनिल शेळके, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, आमदार पंकज भुजबळ, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश उपाध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम,प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील, माजी आमदार जयंत जाधव, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

follow us