राज्यातील विविध जिल्ह्यांत ड्रग्जचे कारखाने आढळून आल्याची माहिती समोर आलेली असतानाच आता आणखी एका जिल्ह्यातही ड्रग्जच्या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यातील कारखान्यावर मिराभाईंदर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केलीयं. मोखाडा तालुक्यातील कावळपाडामध्ये एका फार्म हाऊसमधून ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
…अन्यथा मीरा बोरवणकर यांच्यावर मानहाणीचा खटला दाखल करू, चाकणकरांचा इशारा
या कारवाईबाबत पोलिसांनी अधिका माहिती दिली नसून या कारवाईदरम्यान गुप्तता बाळगण्यात आल्याचं समोर येत आहे. त्यामुळे या छापेमारीमध्ये पोलिसांनी नेमका किती किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. छापेमारीमध्ये कोणाला अटक केली? याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता या ड्रग्ज प्रकरणाचा आणखी कोणत्या जिल्ह्याशी संबंध आहे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
MP Election 2023 : मिर्ची बाबांनी काँग्रेस सोडली, समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणार
गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय(DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आलीयं छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Israel Hamas War : भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात, औषधांसह जीवनावश्यक वस्तू केल्या रवाना
संभाजीनगरमध्ये छापेमारी करण्यात आलेल्या रसायनाच्या कारखान्यामध्ये तब्बल 200 कोटी किमतीचे ड्रग्ज तयार करण्यात आले होते, तर 300 कोटी रुपयांचा कच्चा मालही आढळून आला आहे. काही दिवसांत या कच्च्या मालापासून 300 कोटी रुपयांची ड्रग्ज तयार करण्याची तयारी होती.
‘…तेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो’; अजितदादांसमोरच शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी काही आरोपींना मिरा भाईंदर परिसरातून अटक करण्यात आली तर वसईमधल्या प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींकडे ड्रग्ज कुठून आले याचा तपास केला असता मोखाडामधील फार्म हाऊसमध्ये हे ड्रग्ज बनवण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापेमारी केली आहे.
पोलिसांनी मोखाडा फार्म हाऊसमध्ये छापा टाकला असता त्यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आढळून आले आहेत. छाप्यात पोलिसांनी हे साहित्य जप्त केले असून शहरातील तरुणांना या ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.