मुंबईः भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची राजकीय अडचण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath sugar factory Parli) केंद्रीय जीएसटीने जप्तीची कारवाई केली आहे. 19 कोटी रुपयांचा जीएसटी थकविल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. परंतु त्यातून वेगळी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यात मला केंद्राकडून काही मदतही मिळालेले नाहीत. त्याबाबत पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अमित शाह यांची भेट घ्यायची आहे. परंतु त्याचीही वेळ मिळाली नाही, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
Delhi Robbery : दिल्लीमध्ये थरारक चोरी! 25 कोटींच्या दागिन्यांची कशी केली चोरी पाहा…
कारखान्यासाठी बँकांकडून मदत होत नसल्याची खंत पंकजा मुंडे यांनी बोलून दाखविली आहे. मी सध्या आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावातून जात आहे. माझे नऊ किलो वजन कमी झाले आहे. मी दररोज बँकांच्या पाया पडत आहे. पण तूर्त तरी कोणीही मदत देत नाही. राज्यातील आठ-नऊ कारखान्यांना केंद्राकडून आर्थिक मदत मागितली होती. त्यात माझ्याही कारखान्याचा प्रस्ताव होता. परंतु मी सोडून इतर सर्व कारखान्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. ही मदत मिळाली असती तर ही वेळ आली नसती, अशी खंतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
के. अन्नामलाई : तमिळनाडूत भाजपचं अख्ख राजकारण फिरविणारा मोदी-शाहंचा हुकमी एक्का
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे यांच्या कारखान्याला केवळ नोटीस आलेली आहे, असे म्हटले होते. त्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर देताना माझ्या कारखान्याला नोटीस आलेली नाही, तर कारखान्यावर जप्ती आलेली असल्याची सांगितले.
पक्ष सोडणार का ? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, ईश्वर करू माझ्यावर ही वेळ येऊ नये. मला अमित शाह यांना भेटायचे आहे. परंतु त्यांनी वेळ दिलेला नाही. मध्यंतरी ते अधिवेशनात, निवडणुकांबाबत व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना वेळ मिळत नसावा, असे मला वाटते. माझ्याविषयी अफवा उठवू नये, काही निर्णय घ्यायचा तो सर्वांना सांगूनच घेईल. जसे विवाहात बंधन असते.
तसे संघटनेबाबत काही बंधन असते. मी संघटनेत वडिलांना बघितले आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्याची वेळ कुणावर येऊ नये, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ता तर राज्यातील सगळेच राजकीय गणिते बदलेले आहेत. पूर्वी सत्तेत दोन पक्ष होते. आता तीन पक्ष आहे, असेही मुंडे म्हणाल्या.