Saif Ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला (Saif Ali Khan) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचं थेट बांग्लादेश कनेक्शन समोर येत आहे. नाव बदलून तो येथे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला ठाणे पश्चिममधून शनिवारी रात्री ताब्यात घेतलं. दरम्यान, मुंबई पोलीस थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक खुलासा करणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या (Mumbai Police) माहितीनुसार, याआधी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी हा आरोपी वेष बदलून ठाण्यातील कामगार वसाहतीत लपला आहे. पोलिसांनी या वसाहतीला घेराव घालून मोठ्या शिताफीनं या हल्लेखोराला ताब्यात घेतलं. आता या हल्लेखोराची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. यातून सैफवर हल्ला करण्याचा त्याचा उद्देश नेमका काय होता हे समोर येईल.
प्रिय सैफ अली खान सर मी आपली माफी मागते; प्रसिद्ध अभिनेत्रीने सैफ अली खानची का मागीतली माफी?
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर हा बांग्लादेशी घुसखोर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानेत सैफवर चाकू हल्ला केला असावा असा संशय पोलिसांना आहे. ठाण्यातील कामगार वसाहतीत तो वेष लपवून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या परिसराची नाकाबंदी केली. घेराव घातला. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीशी या व्यक्तीचा चेहरा मिळताजुळता दिसत आहे. पोलिसांना त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी काल मध्य प्रदेशातून एका संशयिताला अटक केली. त्याची चौकशी सुरू केली होती. परंतु, पोलिसांनी या संशयितासह आणखी कुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यांचा बहुतेक या प्रकरणाशी काही संबंध नसावा असे वरकरणी दिसत आहे. पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच या शक्यतेवर शिक्कामोर्तब होईल.
हल्लेखोर घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता. खान कुटुंबीय कसेबसे बाराव्या मजल्यावर गेले. समोरच दागिने पडले होते पण हल्लेखोर तिथे पोहोचू शकला नाही. त्याने कोणत्याही वस्तुंची चोरी केली नाही. ज्यावेळी सैफ आणि त्याच्यात झटापट सुरू होती त्यावेळी तो आरोपी खूप आक्रमक झाला होता, अशी माहिती अभिनेत्री करिना कपूर खान हीने पोलिसांना दिली होती.
घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता सैफने त्याला..करिनाने पोलिसांना काय सांगितलं?