Download App

एका बेपत्ता मुलीच्या शोधासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांना मोठे यश: तब्बल 35 मुलींची सुखरुप सुटका

मुंबई : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हाताला मोठे यश मिळाले आहे. मागील वर्षीत धारावी परिसरातून बेपत्ता झालेल्या तब्बल 35 मुलींची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. या सर्व मुलींना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आहेत. पांजीपाडा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात कुणाल पांडे आणि सिकंदर शेख यांना अटक करण्यात आली आहे. (Police have safely rescued 35 girls who went missing from Dharavi area last year)

मागील काही दिवसांपासून राज्यातून मुली आणि महिला बेपत्ता होण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरुन शिंदे सरकारवर कडाडून टीका केली आहे. अशात सप्टेंबर महिन्यात मुंबईतून 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार धारावी पोलिसांना प्राप्त झाली. तपास केला असता, संबंधित मुलीला अपहरण करुन पश्चिम बंगालमध्ये नेले असल्याची माहिती मिळाली. या अल्पवयीन मुलीच्या शोधात पोलीस पश्चिम बंगालमध्ये गेले.

Maratha Reservation : जरांगे पाटील मुंबईत येणारच, आम्हाला.. शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांचं विधान

याबाबत धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एक 17 वर्षीय मुलगी सप्टेंबर महिन्यात बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात संबंधित मुलीचे अपहरण करून तिला पश्चिम बंगालमध्ये वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचे समोर आले होते. पांजीपाडा परिसरात ही मुलगी असल्याचीही माहिती मिळाली होती.

यानंतर धारावी पोलिसांच्या पथकाने बंगाल गाठून कुंटणखान्यातून या मुलीची सुटका केली. त्यावेळी तिथे यापूर्वी बेपत्ता झालेल्या 35 मुलींचीही सुटका करण्यात आली. दरम्यान, या कारवाईने धारावी पोलिसांनी 2023 मधील सर्व बेपत्ता मुलांची प्रकरणे सोडवली आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात कुणाल पांडे आणि सिकंदर शेख यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News: मुंबईत 5.77 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट जप्त, आरोपीला अटक

दुसर्‍या एका प्रकरणात, घर सोडून पटनाला जाणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीचीही पोलिसांनी घरवापसी केली. गुरुवारी अपहरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी ती मुलगी लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन पाटण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढत असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मुलीला रावेर रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले आणि तिला सुखरुप घरी पोहोच केले.

follow us