Download App

Police Medals 2023: देवेन भारतींसह चौघांना राष्ट्रपती पदक

  • Written By: Last Updated:

Police Medals 2023: मुंबईः पोलीस पदकांची (police medals) आज घोषणा झाली असून, महाराष्ट्रातील (Mahrashtra Police) ७४ पोलिसांना पदके जाहीर झाली आहेत. यात चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यात मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. या वर्षी ९१० जणांना पोलिस पदक जाहीर झाले असून, त्यात महाराष्ट्रातील ७४ जणांना पदक मिळाले आहेत. त्यात चार राष्ट्रपती पदक आहेत. मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुपकुमार सिंग, मुंबईमधील पोलीस उपनिरीक्षक संभाजी नारायण देशमुख, ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनाजी जाधव यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर ३१ जणांना पोलिस शौर्यपदक (पीएमजी) जाहीर झाले आहे. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना पोलिस शौर्यपदक मिळाले आहे. तर ३९ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) पदक जाहीर झाले आहे.

पोलीस शौर्यपदक (पीएमजी)-मनिष कलवानिया (आयपीएस), संदीप मंडलिक (एपीआय), राहुल नामदे (एपीआय), सुनील बागल (पीएसआय), देवेंद्र आत्रम, गणेश दोहे, एकनाथ सिद्दम, प्रकाश नरोटे, दिनेश गावडे, योगीराज जाधव, अमोल फडतरे, सदाशिव देशमुख, प्रेमकुमार दांडेकर, राहुल आव्हाड, राजेंद्र मादवी, देवेंद्र आत्रम यांच्यासह ३१ जणांना हे पदक मिळाले आहे.

प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदक-जयकुमार सुसराज (आयपीएस), लखमी गौतम (आयपीएस), निशित मिश्रा, संतोष गायके यांच्यासह ३९ जणांना हे पदक मिळाले आहे.

Tags

follow us