“त्यांच्या त्रासामुळेच भाजप सोडतोय”; अजितदादांवर टीका करत माजी मंत्र्यांची मोठी घोषणा

अजित पवारांनी पक्षात असताना पक्षाच्या बाहेर असतानाही त्रास दिला म्हणून मी आता त्यांचा नाद सोडतोय

Ajit Pawar

Ajit Pawar

Maharashtra Elections 2024  : मी अजून तरी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहे. मात्र,  मी आणि माझ्या मुलाने पवार साहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी पक्षात असताना आणि पक्षा बाहेरही अजित पवारांनी मला त्रास दिला. अशा परिस्थितीत पवार साहेबांच्या पक्षात जाण्याचा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे, अशा शब्दांत भाजप नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

लक्ष्मण ढोबळे आज आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे काय सांगाल असे विचारले असताा ढोबळे म्हणाले, भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मी अजून दिलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊन येत्या दोन दिवसांत काय तो निर्णय घ्यायचा असं ठरलं आहे. सर्व सहकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी निर्णय जाहीर करणार आहे.

महाविद्यालयीन जीवनापासूनच मी राजकीय काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी पवार साहेबांच्या मार्गदर्शनात जीएसच्या निवडणुका आम्ही पार पाडल्या. नंतर नगरपालिकेच्या निवडणुका पार पाडल्या. या सर्वच क्षेत्रात मी यशस्वी झालो. अशा प्रकारे महाविद्यालयीन जीवनापासूनच मी पवार साहेबांच्या मार्गदर्शनात घडण्याचा पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आज यामध्ये माझ्या मुलाने पुढाकार घ्यावा यासाठी मी माझ्या मुलाला पवार साहेबांच्या स्वाधीन करतोय. यासाठीच पवार साहेबांची त्याच्याशी ओळख करून देण्यासाठी आज मी येथे आलोय.

Video : पाठीत वार काय करता, हिंमत असेल तर समोरा-समोर लढा; पटोलेंचा थेट ‘नावं’ घेत हल्ला

अतिशय अडचणीच्या काळात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार होत असताना मीही मोलाची कामगिरी पार पाडली. स्वामीनिष्ठेचं राजकारण केलं. त्याचा फायदा घेऊन आज मी पवार साहेबांबरोबर मुलाची ओळख करून देणार आहे. आता मुलाला पवार साहेबांनी आधार द्यावा अशी अपेक्षा आहे. अडचणीच्या काळात पवार साहेबांबरोबर राहण्याची गरज आहे हे मी मुलाला समजावून सांगितलं आहे. त्यामुळे मी आणि माझ्या मुलाने पवार साहेबांना साथ देण्याचं निश्चित केलं आहे, असे ढोबळे म्हणाले.

भाजपसोबत जाण्याची कारणं काय होती आणि आता तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीत का परतताय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ढोबळे म्हणाले, पक्षात सासूबरोबर वाद झाल्यानंतर आपण बाजूला राहावं असा विचार सून करत असते. त्याच पद्धतीनं बाजूला राहण्याचा प्रयत्न केला खरा पण, वाटणीला पुन्हा सासूच आली. हे लक्षात आल्यानंतर अजित पवारांना नमस्कार करून आता ज्या माणसानं आपल्याला एवढा त्रास दिला. एवढं आमचं नुकसान केलं.

अजित पवारांनी कायमच त्रास दिला

अशा परिस्थितीत पुन्हा एका फटकळ तोंडाला तोंड देण्यापेक्षा तिथे अपमानित होण्यापेक्षा. आपल्या अपमानावर कुणाचा अहंकार पोसला जात असेल पोसू द्या, तो तुमचा तुम्हाला लखलाभ असो असे सांगून तो विषय आम्ही हाताळलाय. अशा परिस्थितीत पवार साहेबांच्या पक्षात जाण्याचा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे असे स्पष्ट करत अजित पवारांनी पक्षात असताना पक्षाच्या बाहेर असतानाही त्रास दिला म्हणून मी आता त्यांचा नाद सोडतोय असे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले.

हरियाणातला निर्णय पण, मेसेज महाराष्ट्र अन् झारखंडला; भाजपनं नेमकं काय केलं?

Exit mobile version