Video : पाठीत वार काय करता, हिंमत असेल तर समोरा-समोर लढा; पटोलेंचा थेट ‘नावं’ घेत हल्ला

  • Written By: Published:
Video : पाठीत वार काय करता, हिंमत असेल तर समोरा-समोर लढा; पटोलेंचा थेट ‘नावं’ घेत हल्ला

Maharashtra Assembly Election 2024 :  भाजपकडून मतदार याद्यांमधून अनेक नावं वगळण्याचे आदेश देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या षडयंत्रात सामील आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

निवडणूक आयोगाने परवा महाराष्ट्राच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे, असं आवाहनही आयोगाकडून कऱण्यात आलं. मात्र, पराभवाच्या भितीने भाजपकडून रडीचा डाव खेळला जात असंही पटोले म्हणाले आहेत. तसंच, राज्य सरकारची योजना दूत मान्यताही रद्द करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदी नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ‘भाजप कडून जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. योजना दूतांच्या माध्यामातून प्रत्येक मतदारसंघातील काही नावं वगळण्याचा आदेश भाजपकडून देण्यात आला आहे. पराभवाच्या भितीने भाजपकडून हे पाप सुरू आहे, मात्र, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर लढा, असं खुलं आव्हानही पटोले यांनी दिलं आहे.

Chandrasekhar Bawankule: जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष; मुख्यमंत्रिपदावरून बावनकुळेंच मोठ विधान

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील तेल्हारा गावातील सरपंचाचा व्हिडीओ दाखवत पटोले यांनी या गावातील मतदारयादीतील 60 नावं वगळण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नाना पटोले यांनी दाखवलेल्या व्हिडीओत तेल्हारा गावाच्या सरपंच किरण गाडेकर यांचा एक व्हिडिओ दाखवत गावातील मतदार याद्यांमधून मतदारांची नावेच वगळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या किरण गाडेकर यांनी त्यांच्यासह गावातील ६० मतदारांचे नाव यादीतून वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दाबवतंत्राचा वापर केला जता आहे. फॉर्म ७ मार्फत‌ आमचे मतदार कमी करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे आजच तक्रार करणार, असल्याचंही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube