…म्हणून त्या 16 जागा काँग्रेसला परत केल्या; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण

Prakash Aambedkar यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 62 मधील 16 जागा काँग्रेसला का दिल्या यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Prakash Aambedkar on 16 Seat return to Congress of BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली असून काँग्रेस 167 जागांवर तर वंचित बहुजण आघाडी 62 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र अर्ज भरण्यासाठी काही तास असताना वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेत काँग्रेसलला तब्बल 16 जागा परत केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी काही तास असताना वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेत काँग्रेसलला तब्बल 16 जागा परत केल्या. त्यावर स्पष्टीकरण देताना आंबेडकर म्हणाले की, मुंबईमध्ये आमच्यापेक्षा जास्त चांगले उमेदवार काँग्रेसकडे होते. त्यामुळे आम्ही 16 जागा त्यांना परत करून दुसऱ्या जागा मागवून घेतल्या आहेत. कारण राजकारणामध्ये कार्यकर्त्यांबरोबर नितीमत्ता देखील बघावी लागते.

France Social Media Rules : ऑस्ट्रेलियानंतर आता ‘या’ देशातही 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी

दरम्यान या जागांवर वंचित बहुजन आघाडीला (VBA) योग्य उमेदवारमिळाल्याने त्यांनी 16 जागा काँग्रेसला परत केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवार अर्ज भरला तर 16 जागांवर उमेदवारमिळाल्याने अर्ज दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात गुंडाना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देणाऱ्या अजितदादांनी हात झटकले…

तर दुसरीकडे अर्ज भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर वंचितकडून याबाबत काँग्रेसला माहिती देण्यात आल्याने या जागांवर काँग्रेलला (Congress) एबी फॉर्म देऊन उमेदवार देता आला नाही. या 16 जागांपैकी काही जागांवर काँग्रेसची चांगली ताकद असताना देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी वंचितच्या मागणीनुसार त्यांना जागा दिल्या होत्या मात्र या ठिकाणी वंचितला उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे आता या 16 जागांवर बंडखोरी करुन अपक्ष उभ्या राहिलेल्या उमेदवारांना काँग्रेस पाठिंबा देत आहे.

Exit mobile version