Download App

आधी शिवसेनेचं अस्तित्व उभं करा मग…; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Pravin Darekar On Uddhav Thackeray : भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. भाजपला (BJP)तडीपार करण्याऐवजी तुम्हालाच लोकांनी तडीपार केलं आहे, अशी घणाघाती टीका प्रविण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्याच्यामुळे वैफल्यातून अशा सभा उद्धव ठाकरे घेत राहणार असल्याची टीका दरेकरांनी केली आहे. आत्ताच उद्धव ठाकरेंना रायगड (Raigad), महाडच्या कोकणच्या लोकांचा पुळका आला. तळीयाची दरड कोसळली तेव्हा आपणच मुख्यमंत्री होतात, मग त्यांना अद्यापही घरं मिळाली नाहीत, याचं पाप कोणाचं असा सवालही यावेळी प्रविण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

गाजावाज करत प्रदर्शित झालेले मराठी सिनेमे का आपटले? जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठिमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रचंड ताकतीनं पाठबळ होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी भेटून सामोपचाराने तडजोडीने सगळे विषय सोडवले. देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्याने समृद्धी महामार्ग झाला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंना कोणताही रस नव्हता, असा आरोप यावेळी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

आज पंचायत ते संसदेपर्यंत भाजपचं बहुमत आहे. देशातला, जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. मग आता भाजपयुक्त वातावरण होतंय की, भाजपमुक्त होतंय हे लक्षात येतं. त्याचवेळी दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा आलेख तपासून पाहावा.

खासदार कमी झाले, आमदार कमी झाले. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आपण चौथ्या क्रमांकावर, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपण चौथ्या क्रमांकावर, आता बाजार समित्याच्या निवडणुकांमध्ये आपलं अस्तित्वच नाही, त्यामुळे आधी स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व निर्माण करा नंतर भाजपला तडीपार असा टोलाही यावेळी प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Tags

follow us