Ajit Pawar on Eknath Shinde Statement : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांच्या (Amit Shah) उपस्थितीत जय गुजरातचा नारा दिला. त्यांच्या या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षांनी खासकरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंना खिंडीत गाठण्याचे काम सुरू केले आहे. सत्ताधारी पक्षातील नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंची थेट पाठराखण केली मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर बोलणच टाळलं. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही, असे अजित पवार म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीतील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी जय गुजरातचा नारा दिला. यावरुन विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे ज्यावेळी जय गुजरात म्हणाले तेव्हा मी तिथं उपस्थित नव्हतो. ते नेमकं काय म्हणाले माहिती नाही. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. त्यामुळे ते नेमकं काय म्हणाले याबाबतची माहिती मला नाही. मी असेपर्यंत तरी तिथे असं काही झालं नव्हतं.
Video : शरद पवारही ‘जय कर्नाटक’ म्हणाले होते; शिंदेंची पाठराखण करताना फडणवीसांचा दाखला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात (Pune) जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा (Jayaraj Sports and Convention Center) उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. आपल्या भाषणाची सांगता करताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. आपल्या भाषणात त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच पुण्यातील गुजराती समाजाच्या कार्याचाही गौरव केला. त्यांच्या याच वक्तव्यावर आता विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.
या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं, म्हणाजे शिंदे यांच गुजरातवर प्रेम व महाराष्ट्रावर प्रेम नाही असं होत नाही. शरद पवारांनीही अशी एकदा कर्नाटकच्या लोकांमध्ये घोषणा दिली होती. (Shinde ) त्यामुळं इतका संकुचीत विचरा कुणी करत असेल तर ते चुकीच आहे. आता विरोधकांना मुद्दे नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखन करून विरोधकांना सुनावलं आहे.