मुंबई : पुण्यातील ससून रूग्णालायतून पळ काढलेल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या (Lalit Patil) मुसक्या आवळल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अनेक प्रश्न उपस्थित करत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या प्रकरणात अजून खूप खोलात जायचे असल्याचे सांगत त्यांनी ललित पाटीलबाबत ठाकरे गटाला समोर ठेवत अनेक खुलासे केले आहेत. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Devendra Fadnavis On Lalit Patil Case)
‘मविआ’चं पाप आमच्या माथी नको, उबाठा सरकारचे कंत्राटी भरतीचे ‘जीआर’ रद्द; फडणवीसांची मोठी घोषणा
फडणवीस म्हणाले की, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ललित पाटील याला 10 नोव्हेंबर 2020 रोजी अटक झाली. त्या काळात उद्धव ठाकरेंनी त्याला नाशिक शिवसेनेचा प्रमुख केले होते. त्याला अटक ज्या गंभीर गुन्ह्यात झाली, त्यामुळे 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पण, त्याला लगेच ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याची चौकशीच झालेली नाही. त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी पुन्हा न्यायालयात अर्ज सुद्धा करण्यात आला नाही. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि त्याचा मुक्काम ससूनमध्येच राहिला. या गुन्हेगाराची साधी चौकशी सुद्धा झालेली नाही. यासाठी कुणी दबाव आणला? तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी की गृहमंत्र्यांनी? आणखी बर्याच गोष्टी आहेत. पण, आज त्या सांगणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.याप्रकरणात अजून खूप खोलात जायचे बाकी असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
14 दिवसांच्या पोलीस कोठडीच्या काळात ललित पाटील रूग्णालयात भरती होता. पोलीस रिमांड मिळालेली असताना ललित पाटीलला पूर्णवेळ रूग्णालयात का ठेवण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत यामागे कुणाचे आशीर्वाद होते का? असे फडणवीस म्हणाले. एवढेच नव्हे तर, चौकशी पूर्ण झालेली नसतानादेखील त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे पत्र का देण्यात आले नाही. या सर्व बाबी लक्षात घेता यामागे नेमका कुणाचा हात किंवा आशीर्वाद होता का की, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री किंवा तत्कालीन गृहमंत्री याला जबादार आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत असून, याप्रकरणाच्या चौकशीसाठी अजून खूप खोलात जायचे आहे. त्यातून अनेक बाबी समोर येतीलच असे ते म्हणाले. याबाबत मी आज काही बोलणार नाही. आता तुम्ही ठरवा, कुणाची नार्को टेस्ट झाली पाहिजे असे म्हणत दाद भुसे, शंभुराजे देसाई यांच्या नार्कोटेस्ट करण्याची मागणी करणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आमदारांना १६ लाखांचा हप्ता मिळतो; संजय राऊतांचा दावा
मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं
राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी तमिलनाडू येथून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतः ललित पाटीलने आपण पुण्यातील ससून रूग्णालयातून पळलो नव्हतो तर, मला पळवलं गेलं होतं असा खळबळजन दावा केला आहे. तसेच यात कुणाकुणाचा हात आहे हे सर्व समोर आणणार असल्याचेही पाटील याने म्हटले आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान ललित पाटील नेमकी कोणा-कोणाची नावे घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी नेताना पाटीलने वरील खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे ललित याला ससूनमधून पळवण्यामागे कुणाचा हात आहे. यात काही राजकीय पाठिंबा आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.