Download App

ललित पाटीलला पुण्यात ‘एन्काऊंटरची’ भीती; न्यायालयात पोलिसांवर मोठा आरोप

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

मुंबई :  मी पुण्यातील ससून रूग्णालयातून पळून गेलो नव्हतो तर, मला पळवण्यात आल्याचा खळबळजन दावा ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil)  याने कॅमेरासमोर बोलताना केला आहे. तमिलनाडू येथून ललित पाटीलला अटक केल्यानंतर आज (दि.18) त्याला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 23) पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर, दुसरीकडे ललितला एन्काऊंटरची भीती वाटत असून, आपल्या जीवाला पुणे पोलिसांकडून (Pune Police) धोका असल्याचा दावा ललितने न्यायालयात केल्याचे एका वकिलाने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तर, ललितचे एन्काऊंटर करू नये अशी भावनिक मागणी ललितच्या आईने अटकेनंतर केली आहे. (Lalit Patil Get Police Custody Till Monday  )

‘देशात मोदी-शहांचा पर्सनल लॉ, अध्यक्षांच्या हाती मात्र तुणतुणे; ठाकरे गटाचा हल्लाबोल

ललित पाटील कधी कुठून आणि कसा पळून गेला याबाबत कोणतीही चर्चा कोर्टात झाली नसल्याचे या वकिलाने म्हटले आहे. परंतु, मुंबई पोलिसांनी कोर्टात ललिच्या रिमांडची मागणी केली असता ती मान्य करत पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, ललितने पुणे पोलिसांबद्दल केलेल्या दाव्यामुळे खरचं पाटीलच्या जीवाला धोका आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अंधेरी कोर्टात नेमकं काय घडलं?

साकीनाका पोलिसांकडून ललित पाटीलच्य कोठडीची मागणी करण्यात आली. नाशिक ड्रग्ज कारखानाप्रकरणी चौकशीत पाटीलचं नाव आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. याच प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी कोठडीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली असून, ललितची बाजू कोर्टात मांडण्यासाठी न्यायालयाकडून वकील देण्यात आला आहे. मात्र, कोर्ट रूममध्ये ललितला बोलू दिलं नसल्याचे सांगितलं जात असून, सोमवारी पुन्हा ललितला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

पुण्यातून पळाल्यानंतर ललित पाटील हा नाशिकमध्ये होता. एवढेच नव्हे तर, नाशिमधून इंदूर, सूरत आणि पुन्हा नाशिकमध्ये आला. तसेच त्याने नाशिक धुळे, छ. संभाजीनगर बंगळुरू असा प्रवास केल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे हे सर्व करत असताना त्याला कोणाचा राजकीय पाठिंबा होता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एन्काउंटर करू नका

ललित पाटील याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांची पाठ थोपटली जात आहे. तर, दुसरीकडे त्याच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना दुसरीकडे याबाबत त्याच्या आई-वडिलांनी भावविक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  ललितला अटक झाल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळालं आहे. मात्र त्याचं म्हणणं ऐकून घ्याव त्यानंतरच त्याच्यावर कारवाई करावी. मात्र, त्याचं एन्काऊंटर करू नये अशी भावनिक मागणी ललित पाटीलच्या पालकांनी केली आहे. सुरूवातीला आमची चौकशी झाली त्यावेळी पोलिसांना काहीही मिळालं नव्हतं असेही ललितच्या आईने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

करोडपती झेंडेंचे निलंबन; भाजपच्या पदाधिकाऱ्याने फडणवीसांना लिहिलेलं ‘ते’ पत्र कारणीभूत?

भावानंतर पोलिसांना आवळल्या ललितच्या मुसक्य

काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला होता. पोलिसांच्या सुरक्षेतून आरोपी फरार झाल्याने पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती. तसेच विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरत सरकारवर गंभीर आरोप केले होते.

मीरा बोरवणकरांच्या आरोपामागे भाजपचा हात? रोहित पवारांचा मोठा आरोप

ललित पाटील हा चेन्नईत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. यानंतर आता त्याला पुण्यात आणलं जाणार आहे. येथे न्यायालयात हजर केले जाईल. याआधी आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. यानंतर आता पोलिसांनी ललित पाटीललाही जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलीस आणखी तपास करतील. त्यामुळे आता तो आणखी कुणाची नावे घेतो, चौकशीतून काय माहिती हाती येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज